Mahindra Discount On XUV400: देशातील आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांपैकी एक असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने ग्राहाकांसाठी एक मोठी ऑफर दिली आहे. कंपनीने आपल्या एसयूव्ही सेक्शनमधील एक्सयूव्ही 400 या इलेक्ट्रिक कारवर तब्बल 1.25 लाखांची सूट देऊ केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने आपली ही एक्सयूव्ही 400 इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवली. त्यानंतर वर्षभराच्या आतच कंपनी या कारवर एवढी मोठी सूट देत आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 450 किलोमीटरपर्यंत धावते. कंपनीने दिलेली ही सव्वा लाखांची सूट सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत असेल असं सांगण्यात आलं आहे.


कधीपर्यंत असेल सूट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ऑटो सेक्टरमध्ये एक्सयूव्ही 400 एमजीच्या झेडएस या इलेक्ट्रिक कार बरोबरच टाटा मोटर्सची निर्मिती असलेल्या नेक्सॉन इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करत आहे. मागील 2 महिन्यांमध्ये महिंद्राने दुसऱ्यांदा आपल्या एकमेवर इलेक्ट्रिक कारवर सूट दिली आहे. सध्या देण्यात आलेली सूट ही थेट सूट आहे. इलेक्ट्रिक स्टेबिलिटी कंट्रोल असणाऱ्या व्हेरिएंटवर ही सूट लागू असणार नाही. एक्सयूव्ही 400 चे 2 व्हेरिएट आहेत. एक ईसी आणि दुसरा ईएल. कंपनी लवकरच एक्सयूव्हीचं नवीन व्हर्जन लॉन्च करण्याची शक्यता आहे. एक्सयूव्ही 400 मध्ये सप्टेंबर महिन्यात सूट देण्यात आल्याने गाडी 15 लाखांहून कमी किंमतीला उपलब्ध होणार आहे.


फिचर्स कोणते?


मागील महिन्यामध्येच कंपनीने एक्सयूव्ही 400 मध्ये नवीन फिचर्सचा समावेश केला होता. यामध्ये इलेक्ट्रिक स्टेबिलिटी प्रोग्राम, टायर प्रेशर मॉनिटरिंग, क्रूझ कंट्रोल आणि फॉग लॅम्पसारखे नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. एक्सयूव्ही 400 ही आर्कटिंग ब्लू, गॅलेक्सी ग्रे, नेपल ब्लॅक, इन्फिनिटी ब्लू, एव्हरेस्ट व्हाइट या 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये सॅटिन कॉपरचा ड्युएल टोन म्हणजेच 2 रंगांचा पर्यायही उपलब्ध आहे. 


नक्की वाचा >> 4 लाखांहून कमी किंमतीत मिळतेय 36 Kmpl मायलेज देणारी नवीकोरी कार; पाहा फिचर्स


कारची नेमकी किंमत किती?


एक्सयूव्ही 400 ची किंमत 15.99 लाखांपासून ते 18.99 लाखांपर्यंत (एक्स-शो रुम प्राइज) आहे. ही सूट दिल्यास कारचं बेसिक व्हेरिएट 13 लाख 74 हजारांपर्यंत विकत घेता येईल. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. अनेक वाहन कंपन्या या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. लवकरच या बाजरपेठेत नवीन गाड्या उतरवण्याचा महिंद्रा कंपनीचा मानस आहे. महिंद्राला सर्वात मोठी स्पर्धा ही टाटा कंपनीशी करावी लागणार आहे. टाटाकडे सध्या या सेगमेंटमधील सर्वात मोठा वाटा आहे.