Cheapest Hatchback With Best 36 kmpl Mileage: कार विकत घ्यायची असेल तर सर्वात आधी भारतीय विचारतात तो प्रश्न म्हणजे 'कितना देती है?' म्हणजेच कारचं मायलेज किती आहे. आधी मायलेजचा विचार आणि मग त्यानंतर फिचर्स वगैरेचा विचार केला जातो. मात्र या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळाल्या तर? दोन्ही गोष्टी मिळणार म्हणजे अधिक पैसे मोजावे लागणार. सामान्यपणे असा कार्स हा सर्वसामान्यांच्या बजेट बाहेरच्या असतात. त्यामुळे अशा कार विकत घेण्याचं सामान्य माणसंचं स्वप्न हे अनेकदा स्वप्नच राहतं. मात्र आपण आज असा एका भन्नाट हॅचबॅक कारबद्दल जाणून घेणार आहोत जी मायलेजच्याबाबतीत फारच उत्तम असून तिच्यामध्ये प्रीमियम फीचर्चही देण्यात आले आहेत. ही कार एका छोट्या कुटुंबासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकते यात शंकाच नाही. हॅचबॅक प्रकारची ही कार सध्या देशातील सर्वात मोठी कारनिर्मिती कंपनी असलेल्या मारुती सुझुकीची निर्मिती आहे. ही कंपनी विश्वासार्हतेच्याबाबतीत भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक असल्याने डोळे बंद करुन या स्वस्तात मस्त कारचा विचार करता येईल असं सांगितलं जातं.
आपण या ठिकाणी ज्या कारबद्दल बोलत आहोत ती कार म्हणजे मारुती सुझुकीची ऑल्टो के 10. (Alto K 10) सर्वात स्वस्त हॅचबॅक कार अशी ओळख असलेली ऑल्टो के 10 मध्ये अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत. या कारचं इंजिन किंमतीचा विचार केल्यास फारच उत्तम आहे. कंपनीने या कारमध्ये सीएनजी इंजिनचा पर्यायही दिला असल्याने किंमतीबरोबरच कारच्या इंधनावरील खर्च वाचवण्याचीही संधी ग्राहकांना आहे. विशेष म्हणजे ही कार ऑटोमॅटिक गेअर बॉक्सच्या पर्यायासहीतही उपलब्ध आहे. कारमध्ये एकाहून एक सरस फिचर्स देण्यात आले आहेत. ऑल्टो के 10 चे फिचर्स काय आहेत पाहूयात...
ऑल्टो के 10 ही एक बजेट फ्रेण्डली कार असूनही यामध्ये 2 एअरबॅग, एबीएस, ईबीडी, रेअर पार्किंग सेन्सर्स, इन्फोटेन्मेंट सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड लॉक, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक्स, इंजिन इंमोबिलायझर्ससारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
नक्की वाचा >> ₹1.25 lakh Off... नुकत्याच लॉन्च झालेल्या या SUV वर घसघशीत सूट! Mahindra ची भन्नाट ऑफर
ऑल्टो के 10 मध्ये कंपनीने 1.0 लीटरचं इंजिन देण्यात आलं आहे. हे पेट्रोल इंजिन 65 बीएचपीची पॉवर जनरेट करतं. तर सीएनजी व्हेरिएंटचं इंजिन 55 बीएचपी पॉवर जनरेट करतं. कारच्या मायलेजबद्दल सांगायचं झाल्यास पेट्रोल इंजिन 25 किलोमीटर प्रती लिटरचं मायलेज देतं. सीएनजी इंजिन एका लिटरमध्ये 36 किलोमीटरचं मायलेज देतं. या सेगमेंटमधील कोणत्याही कारचा विचार केल्यास हे सर्वोत्तम मायलेज आहे.
ऑल्टो के 10 ही मेन्टेन्ससंदर्भातही सर्वात कमी खर्च असणारी कार असल्याचं सांगितलं जातं. कारच्या वर्षिक मेन्टेन्सचा खर्च केवळ 6 हजार रुपयांपर्यंत येतो. मात्र या खर्चमध्ये कारची सर्व्हिसिंग किंवा एखादा भाग बदलणे यासारख्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला नाही. तो खर्च वगळून वरील खर्च देण्यात आला आहे.
कारच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास या कारची किंमत 3.99 लाखांपासून सुरु होते. ही या कारची बेसिक एक्स शो रुम किंमत आहे. कारचं टॉप एण्ड मॉडेल 5.96 लाखांपर्यंत येतं.