मुंबई : भारतात इलेक्ट्रीक कारचे काही मोजके पर्याय उपलब्ध आहेत. कोणाला जर इलेक्ट्रीक कार खऱेदी करण्याची असेल तर त्याला जास्त वेळ लागणार नाही. इलेक्ट्रीक गाड्यांमध्ये Hyundai ची Kona Electric एसयूवी, MG ची ZD ईवी, Tata Motors ची Nexon Electric गाड्यांचा पर्याय आहे. याशिवाय लवकरच मार्केटमध्ये Mahindraची इलेक्ट्रीक एसयूवीज येणार आहे. पेट्रोल डिझेल एसयूवीजबाबत बोलायचं झालं तर महिंद्राच्या गाड्यांना चांगली मागणी आहे.


Mahindra eXUV300


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Mahindra eXUV300 कंपनीची लोकप्रिय आणि सुरक्षित एसयूवी XUV300 वर आधारित आहे. कंपनीने या एसयूवीचं यश पाहता इलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये eXUV300 भारतीय मार्केटमध्ये आणण्याची योजना बनवली आहे. ऑटो एक्सपो 2020 मध्ये देखील ती सादर करण्यात आली होती. ही एक स्टाइलिश इलेक्ट्रिक एसयूवी असणार आहे. जी सिंगल चार्जमध्ये 375 ते 400 किलोमीटर पर्यंत धावणार आहे. eXUV300 कंपनीची पॉपुलर सब-कॉम्पॅक्ट एसयूवीचा हा इलेक्ट्रिक अवतार असणार आहे. Mahindra eXUV300 डिझाइनच्या बाबतीत XUV300 सारखीच आहे. पण काही मोठे अपडेट्स त्यामध्ये असतील.


Mahindra eKUV100


Mahindra eKUV100 मध्ये 15.9 किलोवॅट लिक्विड कूल मोटर लावण्यात आली आहे. जी 54Ps पावर 120NM टॉर्क जनरेट करणार आहे. चांगल्या बॅटरीमुळे एसयूवी जवळपास 147 किमी देण्यात सक्षम आहे. या कारमध्ये फास्ट चार्जिंग फीचर ही देण्यात आला आहे. ज्यामुळे 80 टक्के चार्जिंग होण्यासाठी 50 मिनिटे लागणार आहेत. या कारची किंमत 8 ते 9 लाखांच्या घरात असू शकते.