नवी दिल्ली : महिंद्रा कंपनीने त्यांच्या गस्टो स्कूटरचं नवं मॉडेल बाजारात आणलं आहे. गस्टो आरएस असं या स्कूटरचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्लीत या स्कूटरची किंमत ४८ हजार १८० रूपये इतकी आहे. Gusto RS मध्ये जुन्या मॉडेलच्या तुलनेत डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहेत. इंजिनमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


महिंद्रा गस्टो आरएस एडिशन स्कूटरमध्ये ड्यूअल टोन पेंटजॉब बघायला मिळेल. ही स्कूटर दोन रंगांमध्ये उपलब्ध होईल. यात लाल-पांढरा आणि निळा-पांढरा या रंगांचा समावेश आहे. महिंद्राची ही गाडी पेटीएम अ‍ॅपवरून खरेदी केल्याच ६ हजार रूपयांची कॅशबॅक ऑफरही देण्यात येत आहे. मात्र ही ऑफर केवळ २० ऑक्टोबरपर्यंतच असेल.  


महिंद्राच्या या नव्या स्कूटरमध्ये गस्टोसारखंच १०९ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिलं गेलंय. हे इंजिन ८ बीएसपीची पावर आणि ९ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला सीव्हीटे ट्रान्समिशन देण्यात आलंय. 


सस्पेंशनसाठी महिंद्रा गस्टो आरएसमध्ये फ्रन्ट व्हिलमध्ये एअर स्प्रिंग्ससोबतच टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागे हायड्रॉलिक शॉक अब्जॉर्बर्स दिले गेले आहेत. यात १२ इंचाचे अलॉय व्हिल दिले आहेत. तसेच यात जास्तीत जास्त ६ लीटर इंधन भरलं जाऊ शकतं. मायलेजबाबत कंपनीने दावा केलाय की, ही स्कूटर एक लीटरमध्ये ६३ किलोमीटर चालते.