साईड सबकुछ! तासाभरात 1.5 लाखांहून अधिक कार बुक; Mahindra च्या कोणत्या कारनं Auto क्षेत्रात घातलाय धुमाकूळ?
Mahindra : ही कार नाही... हे अनेकांचं स्वप्न, तर काहींचं स्वप्न आहे. काय आहेत कारचे फिचर, किती आहे किंमत आणि सर्वात महत्त्वाचं, ही कोणत्या मॉडेलची कार आहे? पाहा
Auto News : महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीकडून कायमच ग्राहक आणि भारतीय रस्त्यांच्या अनुषंगानं उत्तमोत्तम कारची निर्मिती केली जाते. Mahindraच्या अशाच कारची सध्या ऑटो क्षेत्रामध्ये चर्चा सुरु असून, निमित्त ठरतोय तो म्हणजे कारप्रेमींकडून का कारला मिळणाला कमाल प्रतिसाद.
ऑगस्ट महिन्यात लाँच केलेल्या या कारचं बुकिंग कंपनीनं 3 ऑक्टोबरपासून सुरू केलं. ज्यानंतर तासाभरातच या कारनं विक्रमी बुकिंग घेत सर्वच प्रतिस्पर्धी कारना पिछाडीवर टाकलं. सकाळी 11 वाजता, बुकिंग सुरू झाल्या क्षणापासून पुढच्या 60 मिनिटांत अर्थात तासाभरातच 1.76 लाख युनिट बुक झालेली ही कार म्हणजे महिंद्रा थार रॉक्स. (Mahindra Thar Roxx Bookings)
महिंद्राच्या थार रॉक्सला इतका प्रतिसाद मिळत असल्यामुळं सहाजीकच मागणी आणि पुरवठ्याच्या सूत्रानुसार आता या कारची चावी हातात येण्यासाठी मात्र बऱ्याच मंडळींना वाट पाहावी लागणार आहे. तुम्हीही हीच कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर सर्वप्रथम तिचे फिचर्स आणि किमतीचा हिशोबही पाहून घ्या.
यंदाच्या वर्षी लाँच झालेली सर्वात लोकप्रिय कार म्हणून महिंद्रा थारकडे पाहिलं जातं. 3 डोर थार म्हणून या कारबाबत फार आधीपासूनच कार प्रेमींमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली होती. पण, 5 डोअर थारमुळं आता अनेकांनाच एक कमाल पर्याय उपलब्ध झाला आहे. महिंद्राच्या या अफलातून कारला पहिल्या तासात. 1,76,218 मॉडेलची बुकिंग मिळाली. सूत्रांच्या माहितीनुसार ऑफलाईन बुकिंगच्या आकड्यांमुळं हा आकडा आणखी वाढू शकतो. 12 ऑक्टोबरपासून या कारची डिलीव्हरी सुरू होणार असून, आता तिच्या ऑनरोड अनुभवाचीच वाट कारप्रेमी पाहत आहेत.
हेसुद्धा पाहा : 'जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून...' झिरवाळांवर कडाडले राज ठाकरे, अजित पवारांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा
थार रॉक्स ही एक ऑफरोड एसयुव्ही असून, या गाडीचं पेट्रोल व्हेरिएंट 2 व्हील ड्राईव्हसह लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये 2.0 लीटरचा टर्बो पेट्रोल इंडिन आहे. तर, ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनवर 162 hp पॉवर आणि 330 Nm टॉर्क जनरेट करते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर ही कार 177 Hp पॉवर जनरेट करते. या कारमध्ये फक्त पेट्रोलच नव्हे, तर डिझेल वर्जनही मिळतं, जिथं ग्राहकांना 4 WD चाही पर्याय देण्यात आला आहे.
राहिला प्रश्न किमतीचा, तर या कारमध्ये 26.03-सेंटीमीटरची ट्विन डिजिटल स्क्रीन देण्यात आली असून, पॅनोरॅमिक स्कायरुफही देण्यात आलं आहे. या कारची एक्स शोरूम किंमत आहे 12.99 ते 22.49 लाख रुपये. किंमत जरा जास्त असली तरीही अनेकांचीच ही ड्रीम कार असल्यामुळं हे गणितही मंडळी जुळवताना दिसत आहेत.