Mahindra Bolero: महिंद्रा आता आपल्या प्रसिद्ध महिंद्रा बोलेरो निओ प्लसचं (Mahindra Bolero Neo+) अपडेटेड व्हर्जन बाजारात दाखल करण्याच्या तयारीत आहे. उपलब्ध माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात ही कार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ही गाडी टियर 2 मार्केटला टार्गेट करणार आहे. ही गाडी 7 व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. दरम्यान, या कारमध्ये नेमके काय फिचर्स असतील, तसंच किमत काय असेल हे जाणून घ्या....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात ही गाडी TUV300 Plus चं फेसलिफ्ट व्हर्जन असणार आहे, जे फार कमी वेळासाठी सादर करण्यात आलं होतं. TUV300 Plus ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यात अयशस्वी ठरली होती. कारण त्यावेळी बाजारात BS6 इंजिन असणाऱ्या गाड्या बाजारावर आपली पकड मजबूत करत होत्या. TUV300 Plus तीन वर्षातच बंद करण्यात आली होती. पण आता कंपनी हेच मॉडेल Bolero Neo+  या नव्या नावाने बाजारात दाखल करत आहे. 


नव्या बोलेरो निओ प्लसमध्ये ग्राहकांनी जास्त सीट्स आणि जागा मिळणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीने या गाडीला दोन सीट कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 7 सीटर आणि 9 सीटरचा पर्याय असेल. त्यामुळे जे लोक कमी खर्च करत जास्त स्पेस आणि जास्त सीट्स असणारी कार खरेदी करण्याचा विचार असतील, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. 


महिंद्रा 2019 पासून या एसयुव्हीची टेस्टिंग करत होती. कंपनी ही कार एकूण 7 व्हेरियंट्समध्ये सादर करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे एक अॅम्ब्यूलन्स व्हर्जनही असेल. बोलेरो हा महिंद्राचा सर्वाधिक विक्री होणारा ब्रँड आहे. कंपनीने प्रत्येक महिन्याला 7 ते 8 हजार युनिट्सची विक्री करते. विशेष म्हणजे महिंद्रा बोलेरोला शहर आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी मोठी मागणी आहे. खासकरुन ग्रामीण भागात तिच्याकडे फार विश्वासाने पाहिलं जातं. 


फिचर्स काय असतील?


बोलेरो निओ प्लसमध्ये कंपनीने 2.2 लीट क्षमतेच्या डिझेल इंजिनचा वापर केला जाणार आहे. हे तेच इंजिन आहे, जे तुम्हाला Scorpio-N मध्ये मिळतं. पण याचा पॉवर आऊटपूट कमी असेल. 


मिळालेल्या माहितीनुसार, हे इंजिन 120Hp ची पॉवर जनरेट करेल. हे इंजिन स्कॉर्पिओ-एनमध्ये 130Hp ची पॉवर जनरेट करतं. या इंजिनला 6-स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्सशी जोडलं जाऊ शकतं. यामध्ये फोर-व्हील ड्राइव्हचा पर्यायही असेल. 


किंमत किती?


महिंद्रा बोलेरो निओ प्लसमध्ये कंपनी अनेक बदल करणार आहे. यामध्ये अत्याधुनिक फिचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या कारच्या किंमतीत थोडीशी वाढ पाहायला मिळू शकते. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या बोलेरो नियोची किंमत 9.63 लाखापासून ते 12.14 लाखच्या दरम्यान आहे. त्यामुळे बोलेरो निओ प्लसची किंमत यापेक्षा थोडी जास्त असेल असा अंदाज आहे. कदाचित या कारला 10 लाखांच्या सुरुवाती किंमतीपासून सादर केलं जाऊ शकतं.