महिंद्राची 9 सीटर TUV300 प्लस लॉन्च, किंमत...
...
मुंबई : महिंद्राने युटिलिटी व्हिआयकल सेकमेंटमध्ये आपली पकड आणखीन मजबूत करण्यासाठी एक नवी एसयूव्ही लॉन्च केली आहे. महिंद्राने आपली दमदार 9 सीटर एसयूव्ही TUV300 प्लस लॉन्च केली आहे. ही गाडी साधारण TUV300 पेक्षा 405mm लांब आहे. ज्या नागरिकांना 8 ते 9 सीटर गाडी कमी किमतीत हवी आहे अशा नागरिकांना लक्षात घेऊन महिंद्राने ही गाडी लॉन्च केली आहे.
ग्राहकांना TUV300 ही गाडी पाच रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये सिल्व्हर, व्हाईट, ब्लॅक, रेड आणि ऑरेंज या रंगांचा समावेश आहे. तसेच ही गाडी तीन व्हेरिएंट (पी4, पी6 आणि पी8) मध्ये उपलब्ध आहे. या मध्ये 2.2 लीटरचं डिझेल इंजिन असून 120 बीएचपी पावर आणि 280 एनएम टॉर्क देतं. महिंद्राने हे इंजिन आपल्या स्कॉर्पिओ गाडीलाही दिलं आहे. या इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत जोडलं आहे.
TUV300 या गाडीत कंपनीने अनेक फिचर्स दिले आहेत. सेफ्टीसाठी ड्युअल एअरबॅग्स देण्यात आले आहेत. तसेच 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम विथ नेव्हिगेशन, मायक्रो हायब्रिड सारख्या फिचर्सचा समावेश आहे. कारला 16 इंचाचे अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत.
TUV300ची किंमत
महिंद्राने लॉन्च केलेल्या एसयूव्ही TUV300 या गाडीची एक्स शोरुम किंमत 9.47 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.