नवी दिल्ली : महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा लिमिटेडने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही XUV500 चं नवं W9 व्हेरिएंट लॉन्च केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या कारची किंमत दिल्लीच्या एक्स शोरूममध्ये १५.४५ लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. या कारमध्ये महिंद्राने W10 व्हेरिएंटमधील अनेक फिचर्स दिले आहेत. Mahindra XUV500 W9 व्हेरिएंटमध्ये कंपनीने इलेक्ट्रीक सनरूफ, रिव्हर्स कॅमेरा विथ डायनॅमिक असिस्ट, ७ इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेट सिस्टम, इकोसेंस टेक्नॉलॉजी, अ‍ॅन्ड्रॉईड ऑटो, इमर्जन्सी कॉल, ड्यूअल एअरबॅग्स असे खास फिचर्स दिले आहेत. 


Mahindra XUV500 W9 मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन उपलब्ध आहेत. या कारची मुख्य स्पर्धा नुकतीच लॉन्च झालेली जीप कॅम्पस एसयूव्ही सोबत असणार आहे. यासोबतच एसयूव्हीच्या Hyundai Creta, Tata Hexa आणि लॉन्च होणा-या  Renault Captur या कारसोबतही असेल. 


महिंद्राची ही एसयूव्ही २.२ लीटर मोटरसोबत मिळेल. हे इंजिन ३,७५० आरपीएमवर १४० पीएसची पावर आणि १,६०० ते २,८०० आरपीएमवर ३३० न्यूटर मीटरचा टॉर्क जनरेट करतं. महिंद्रा XUV 500 मध्ये ५ स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे.