कोईम्बतूर : यंदा देशभरात 75 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022)  साजरा होणार आहे. याचपार्श्वभूमीवर भारत सरकारने हर घर तिरंगा मोहिमेची सुरूवात केली.  ज्या अंतर्गत पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. अशातच एका कलाकाराने 'हर घर तिरंगा' (Har Ghar tiranga) बाबत अशी अप्रतिम गोष्ट केली आहे, जी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एका सामाजिक कार्यकर्त्याने त्याच्या उजव्या डोळ्यामध्येच भारतीय तिरंगा ध्वज रंगवला आहे.


लोकांमध्ये देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्व देशवासियांना घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना 2 ते 15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्य दिनापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांचे डिपी बदलून राष्ट्रध्वज ठेवण्यास सांगितले आहे.


असा रेखाटला राष्ट्रध्वज


कोईम्बतूर जिल्ह्यातील कुनियामुथूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि लघुचित्रकार युएमटी राजा  (52) यांनी भारतीय ध्वजाच्या रंगात डोळा रंगवण्यास सुरुवात केली. हे करण्यासाठी आधी त्याने अंड्याच्या कवचातील पांढऱ्या भ्रूणावरील अत्यंत पातळ फिल्मवर राष्ट्रध्वजाचे लघुचित्र रेखाटले. नंतर ते डोळ्यावरील पांढऱ्या बुबळावर चिकटवले. या पेंटींगसाठी तासभर त्याने काम केलं.