नवी दिल्ली : मारूती सुझुकीने त्यांची हॅचबॅक कार अल्टो ८०० चं नवीन एडिशन लॉन्च केलंय. कारच्या या स्पेशल एडिशनची किंमत ३.५४ लाख रूपये ठेवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेस्टीव्ह सीझनच्या निमित्ताने कंपनीने अनेक अपडेटसह ही कार लॉन्च केली आहे. हे अपडेट कारच्या लूकमध्ये आणि इंटेरिअरमध्ये करण्यात आल्याने कार अधिक आकर्षक झाली आहे. 


अल्टो ८०० उत्सव एडिशनमध्ये नवीन ग्राफिक्स, रिअर व्ह्यू मिरर कव्हर गार्निश, डोर सील गार्ड आणि इतरही अ‍ॅक्सेसरीज नव्याने देण्यात आल्या आहेत. या कारमध्ये नवीन सीट कव्हर देण्यात आले आहेत. यासोबतच या लिमिटेड एडिशन कारमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेराच्या रूपात नवीन सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये कोणताही मेकॅनिकल बदल करण्यात आलेला नाही. 


जुन्या मॉडलसारखंच ७९६ सीसीचं तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं असून जे ४७.३ बीएचपीची पावर आणि ६९ एनएम टॉर्क जनरेट करतं. तर इंजिनला ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने जोडण्यात आलं आहे. या कारची स्पर्धा आता रेनो क्विड, हुंद्याई इयॉन आणि डटसन रेडी-गो कारसोबत असणार आहे.