नवीन अवतारात येणार भारताची बेस्ट सेलिंग व्हॅन, गाडीचा `New Look` तुम्हाला वेड लावेल
भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2022 पर्यंत नवीन पिढीची इको व्हॅन लॉन्च करणार आहे.
मुंबई : भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2022 पर्यंत नवीन पिढीची इको व्हॅन लॉन्च करणार आहे. एका मीडिया रिपोर्टचा हवाला देऊन असे कळले आहे की, 11 वर्षांनंतर कंपनी भारतातील सर्वाधिक विकली जाणारी व्हॅन पूर्णपणे बदललेल्या शैलीत सादर करणार आहे. मारुती सुझुकी Eeco ही 2022 च्या आर्थिक वर्षात भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. कंपनी कदाचित याच वर्षी कारची निर्यात सुरू करू शकते.
गेल्या आर्थिक वर्षात, मारुती सुझुकीने 1 हजारपेक्षा कमी Eeco व्हॅनची निर्यात केली होती, मात्र आता कंपनीचे निर्यात धोरण बदलले आहे आणि कंपनीने केवळ निर्यातीचे प्रमाण दुप्पट केले नाही, तर मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी वाहन निर्यातक कंपनी बनली आहे.
ही कार परदेशी बाजारपेठेत लोकप्रिय करण्यासाठी कंपनी नवीन जनरेशन इकोसोबत पॉवर स्टिअरिंग देणार आहे.
ही व्हॅन 2010 मध्ये प्रथमच लाँच करण्यात आली आणि लॉन्च झाल्यानंतर दोन वर्षांत कंपनी 1 लाख युनिट्सची विक्री करण्यात यशस्वी झाली. 2018 मध्ये कंपनीने या कारच्या 5 लाख युनिट्सची विक्री पूर्ण केली होती.
31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने देशांतर्गत बाजारात Eeco च्या 9 हजार 500 युनिट्सची विक्री केली आहे. या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी इको व्हॅनची थेट स्पर्धा नाही, त्यामुळे त्याची विक्री जोरदार आहे.
या व्यतिरिक्त, लवकरच कंपनी 5-डोर जिमनी ऑफ-रोडर देखील लॉन्च करणार आहे. जी उत्कृष्ट लुक आणि उत्कृष्ट शैलीमध्ये सादर केली जाईल.
याशिवाय मारुती सुझुकीने सीएनजी सेगमेंटवरही अधिक लक्ष केंद्रित केले आहे, त्याच प्रकारे कंपनी विटारा ब्रेझा सीएनजीसह अनेक विद्यमान कारचे सीएनजी प्रकार लॉन्च करू शकते.