Top 5 Things Of Maruti Grand Vitara : बहुप्रतिक्षित मारुती सुझुकी ग्रँड विटारा कॉम्पॅक्ट SUV अखेर भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. उद्यापासून ही कार ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. इच्छुक ग्राहक 11,000 रुपयांची टोकन रक्कम भरून नवीन ग्रँड विटारा ऑनलाइन किंवा अधिकृत डीलरशिपद्वारे बुक करू शकतात. हे बुकिंग सध्या सुरू झालं आहे. तसेच, येत्या ऑगस्टला म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये या कारची किंमत जाहीर केली जाण्याची शक्तता आहे. सध्या या कारचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स याबद्दल बुधवारी म्हणजेच उद्या माहिती दिली जाणार आहे. आज आम्ही तुम्हाला या नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटारा कॉम्पॅक्ट एसयूव्हीशी संबंधित 5 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.


कुठे उपलब्ध असणार ही कार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नवीन मारुती ग्रँड विटाराची विक्री 'नेक्सा प्रीमियम डीलरशिप नेटवर्क'द्वारे केली जाणार आहे. हे या ब्रँडचं नवीन फ्लॅगशिप मॉडेल असेल आणि जुन्या एस-क्रॉस क्रॉसओवरची जागा घेईल.


इथं होणार या कारचं प्रोडक्शन...



नवीन ग्रँड विटाराचे प्रोडक्शन टोयोटाच्या कर्नाटकातील बेंगळुरूजवळील बिदाडी येथील प्रोडक्शन कंपनीत केलं जाणार आहे. नवीन ग्रँड विटारा सुझुकीच्या ग्लोबल-सी प्लॅटफॉर्मवर (काही बदलांसोबत) डिझाइन आणि विकसित करण्यात आली आहे.


इंजिन पर्याय



नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये इंजिनचे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत. यात सुझुकीचं 1.5L K15C ड्युअल-जेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिन माइल्ड हायब्रिड सेटअपसह पर्याय म्हणून मिळणार आहे. दुसरीकडे, टोयोटाचं 1.5L 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मजबूत-हायब्रिड तंत्रज्ञानासोबत हा दुसरा पर्याय म्हणून उपलब्ध असणार आहे.


फीचर्स



पॅनोरामिक सनरूफ, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, रीअर एसी व्हेंट्ससह ऑटोमॅटिक एसी, ईव्ही मोड (स्ट्राँग हायब्रीड), एचयूडी, कनेक्टेड कार टेक, रिक्लिनिंग रीअर सीट्स, व्हेंटिलेटेड सीट्स आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी फीचर्स उपलब्ध असणार आहेत.


इतक्या किंमतीत मिळणार ही कार आणि 'या' कारर्सला टाकणार मागे



या कारची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, MG Aster, Volkswagen Taigun आणि Skoda Kushak सारख्या कारशी होईल. नवीन विटाराची किंमत 9.5 लाख रुपयांपासून सुरू होऊन 18 लाख ते 22 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे.