Maruti Suzuki Jimny launch: भारतात मारुति सुझुकीच्या गाड्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. आता कंपनी महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी जिमनी (Maruti Suzuki Jimny) बाजारात आणणार आहे. या गाडीबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकतीच या गाडीचा फर्स्ट लूक एका चाचणीदरम्यान दिसून आला आणि याबाबतचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये 5 डोअर मॉडेलचं अनावरण केलं जाण्याची शक्यता आहे. मारुति सुझुकी जिमनीच्या 5 डोअर व्हर्जनचा व्हिडीओ समोर आला आहे. यात 7 सीटिंगचा पर्यायही उपलब्ध आहे. जागतिक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या 3 डोअर जिमनी सिएराची लाँग व्हीलबेस व्हर्जन आहे. व्हिडीओत एसयूव्हीमध्ये ब्लॅक अलॉय व्हील्स आणि डोअर हँडल्ससह मागच्या दरवाज्यावर स्पेअर व्हिल देण्यात आला आहे. कारच्या आतील भागात पाहिल्यास सीट्सवर लाल रंगाची अपहोल्स्ट्री दिसून येते. आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मॉडेलप्रमाणे 4 व्हील ड्राइव्ह प्रणालीसह सुसज्ज असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनी ऑटो एक्सपोमध्ये मारुति सुझुकी जिमनीचं 5 सीटर मॉडेल सादर करेल.यामध्ये 7 सीट्सचा पर्याय देखील असेल. मागील रो मधील अतिरिक्त जागा जंप सीट्स म्हणून दिल्या जातील. ही एसयूव्ही फीचर लोड असण्याची शक्यता आहे. कनेक्टिव्हिटीसह 9.0-टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स यासारख्या अनेक वैशिष्ट्ये यात आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


बातमी वाचा- Second Hand मार्केटमध्ये या गाड्यांना मोठी मागणी, देखभाल खर्चही परवडणारा


मारुति एसयूव्हीमध्ये 1.5-लिटर K15C नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि हायब्रिड तंत्रज्ञान असू शकते. हे इंजिन 103 PS आणि 136 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय असतील.