Maruti च्या या मॉडेल्सवर अजूनही मिळतोय ३० हजारापर्यंतचा डिस्काऊंट
कार निर्माता कंपनी साधारणपणे वर्षाच्या शेवटी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन येतात. यात कंपन्या अनेक गाड्यांवर कंपन्या वेगवेगळे डिस्काऊंट दिले जातात.
मुंबई : कार निर्माता कंपनी साधारणपणे वर्षाच्या शेवटी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन येतात. यात कंपन्या अनेक गाड्यांवर कंपन्या वेगवेगळे डिस्काऊंट दिले जातात. याचा परिणाम म्हणून २०१७मध्ये चारचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. साधारणपणे जानेवारीमध्ये पुन्हा जुन्या दरांमध्ये गाड्यांची विक्री केली जाते. मात्र यावेळी असे झाले नाही. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या गाड्यांवरील डिस्काऊंट २०१८मध्येही कायम ठेवलाय.
या मॉडेल्सवर मिळतेय सूट
न्यूज एजन्सी कोजेंसिसनुसार मारुती सुझुकी आपल्या अनेक मॉडेल्सवर जानेवारी २०१८मध्ये २० हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट देतेय. याआधी डिसेंबर २०१७मध्येही कंपनीने अनेक गाड्यांवर डिस्काऊंट दिला होता. डिस्काऊंटबाबत बोलायचे झाल्यास मारुतीच्या इग्निस, सियाज, वॅगनारवर ३० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला जात आहे. तर मारुती अर्टिगावर २० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला जातोय.
ऑल्टो ८००वर २५ हजार रुपयांची सूट
मारुतीची सर्वाधिक विकली जाणारी कार ऑल्टो ८००वर २५ हजार रुपयांची सूट दिली जातेय. मारुती सुझुकीने नेक्सा शोरुमद्वारे विकल्या जाणाऱ्या कार बलेनोशिवाय कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हिटारा ब्रिझा आणि स्विफ्टवर कोणताही डिस्काऊंट दिला जात नाहीये.
...म्हणून दिला जातोय डिस्काऊंट
मारुतीची नोव्हेंबरमध्ये झालेली विक्री पाहता हे लक्षात येते की मिड साईझ कॅटेगरीच्या सेलमध्ये कंपनीला मोठा झटका बसलाय. फक्त डिसेंबरमध्ये मिड साईझ कॅटेगरी सियाझचा सेल ३५.८ टक्क्यांपर्यंत घसरला. याच कारणामुळे कंपनीने सियाझवर ३० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट जाहीर केलाय.
विक्रीमध्ये १.८ टक्क्यांची घसरण
नोव्हेंबरमध्ये मिनी कार(ऑल्टो आणि वॅगॅनार) च्या कार विक्रीमध्ये १.८ टक्के घसरण झाली होती. कंपनीने या कारच्या विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी ग्राहकांना डिस्काऊंट ऑफर केलाय.