Auto Expo 2023 : कोरोना कालावधीनंतर ऑटोक्षेत्रानं पुन्हा एकदा भरारी घेतली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे कल वाढला आहे. ग्राहकांची पसंती देखील इलेक्ट्रिक गाड्यांना मिळत आहे. असं असताना मारुति सुझुकी ही कंपनी कशी मागे राहील. मारुति सुझुकीच्या गाड्यांना देशात मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुति सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली. या गाडीची कित्येक दिवसांपासून कारप्रेमी आतुरतेने वाट पाहात होते. मारुति सुझुकी कंपनीने कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही eVX ची झलक दाखवली.  Maruti eVX Electric SUV एक मिड साइज इलेक्ट्रिक एसयूव्ही असून यात 60 किलोवॅटचा बॅटरी पॅक दिला आहे. ही बॅटरी फुल चार्जवर 550 किमी ड्रायव्हिंग रेंज देईल, असा दावा करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने इलेक्ट्रिक एसयूव्हीला होरिझोंटल हुड, फ्लेयर्स व्हील आर्केजसह स्पोर्टी लूक दिला आहे. यात व्हीलबेस लांब असल्याने अधिक स्पेस मिळते. या गाडीची लांबी 4300 मीमी, रुंदी 1800 मीमी आणि उंची 1600 मीमी आहे. या गाडीत एलईडी लाईट बसवण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुढे इतर एसयूव्हीप्रमाणे ग्रिल नाही. बाजूला ओआरव्हीएमऐवजी कॅमेरे दिले आहेत. दरवाजा उघडण्यासाठी फ्लश डोअर हँडल्स दिले आहेत. 



बातमी वाचा- भारतात iPhone निर्मितीसाठी टाटा ग्रुपचा पुढाकार! नेमकं काय शिजतंय वाचा


गाडी कधी लाँच होणार?


मारुति सुझुकीने सादर केलेली गाडी कधीपर्यंत बाजारात येणार याबाबत उत्सुकता आहे. कंपनी अध्यक्ष आणि डायरेक्टर तोशिहिरो सुझुकी यांच्या मते, ही गाडी 2025 साली बाजारात उपलब्ध होईल. या गाडीची स्पर्धा महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा या गाड्यांशी असेल.