भारतात iPhone निर्मितीसाठी टाटा ग्रुपचा पुढाकार! नेमकं काय शिजतंय वाचा

Tata Group Interested To Make iPhone: आतापर्यंत आयफोन 14 सीरिज लाँच झाल्या आहेत. दरवर्षी एक सीरिज लाँच करत अ‍ॅपल कंपनी ग्राहकांना आकर्षित करत असते. आता आयफोन 15 सीरिजबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आपली सीरिज लाँच करते. भारतात, विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप सारख्या तैवानच्या उत्पादक कंपनीद्वारे आयफोन असेंबल केले जातात.

Updated: Jan 10, 2023, 01:55 PM IST
भारतात iPhone निर्मितीसाठी टाटा ग्रुपचा पुढाकार! नेमकं काय शिजतंय वाचा title=

Tata Group Interested To Make iPhone: आतापर्यंत आयफोन 14 सीरिज लाँच झाल्या आहेत. दरवर्षी एक सीरिज लाँच करत अ‍ॅपल कंपनी ग्राहकांना आकर्षित करत असते. आता आयफोन 15 सीरिजबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आपली सीरिज लाँच करते. भारतात, विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप सारख्या तैवानच्या उत्पादक कंपनीद्वारे आयफोन असेंबल केले जातात. नुकतंच टाटा ग्रुपने तैवानच्या विस्ट्रोन कॉर्पोरेशनसोबत शेवटच्या टप्प्यातील बोलणी पूर्ण केली. बंगळुरू येथील आयफोन निर्मिती कारखाना खरेदी करणार असल्याचं ब्लूमबर्गने आपल्या अहवालात सांगितलं आहे. मार्च 2023 पर्यंत हा करार निश्चित होईल असंही सांगण्यात आलं आहे. टाटा ग्रुप जवळपास 5000 हजार कोटी रुपयात आयफोन निर्मिती कारखाना विकत घेणार आहे. नव्या आर्थिक वर्षात आयफोन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे. हा करार निश्चित झाल्यास टाटा भारतातील पहिला स्वदेशी आयफोन निर्माता कंपनी बनणार आहे. मात्र याबाबत टाटा, अ‍ॅपल आणि विस्ट्रोननं कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही.

कोविड काळात लस पुरवठ्यावरून अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले गेले होते. टाटा कंपनीच्या या हालचालीमुळे भारताचे अमेरिकेशी राजकीय संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल. तसेच चीनचं इलेक्ट्रॉनिक जगात असलेलं वर्चस्व कमी करण्यातही भारताला यश मिळेल, असं सांगण्यात येत आहे. आयफोनचे 85 टक्के भाग चीनमध्ये तयार केले जातात. त्यामुळे आयफोन निर्मितीत चीनचा दबदबा पाहायला मिळतो. आयफोन चीनवर अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. दुसरीकडे चीनमधील कोरोना स्थिती पाहता उत्पादक क्षमताही घटते, त्यामुळे कंपनीला नुकसान सोसावं लागतं. तसेच ग्राहकांचा वेटिंग पिरियडही वाढतो.

बातमी वाचा- iPhone वापरताय? तुमच्या फोनमध्ये काय होतंय हे तुम्हाला कळणारच नाही

कुठे आहे विस्ट्रॉनचा निर्मिती कारखाना

विस्ट्रॉनचा 2.2 मिलियन चौरस फूट कारखाना बंगळुरूपासून 50 किलोमीटरवर आहे. हा करार झाल्यास टाटा सर्व आयफोनसह कारखान्यातील 10 हजार कर्मचाऱ्यांना घेईल. यात काही अभियंत्यांचाही समावेश आहे.

iPhone किमतीत काय फरक पडणार?  

महागडे फोन अशी आयफोनची आणखी एक वेगळी ओळख आहे. या फोनची निर्मिती भारतात झाल्यास आणखी स्वस्त होऊ शकतो.  iPhone 15 आणि iPhone 15 Plus हे बजेट फोन असण्याची शक्यता आहे. सध्याच्या iPhone 14 Plus ची सुरुवातीची किंमत 128GB स्टोरेज बेस मॉडेलसाठी 89,900 रुपये आहे. तर,  iPhone 14 ची किंमत 79,900 रुपये इतकी आहे. रिपोर्टनुसार, iPhone 15 सीरीज iPhone 15 आणि iPhone 15 Plus चे बेस मॉडेल जुन्या सीरीज iPhone 14 आणि iPhone 14 Plus पेक्षा स्वस्त असू शकतात असा देखील दावा केला जात आहे.