मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) वॅगन आर (Wagon R) नव्या रुपात आज पुन्हा एकदा बाजारात दाखल होतेय. वॅगन आर ही गाडी ग्राहकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कंपनी आपल्या या नव्या स्वरुपातील वॅगन आरला केवळ दोन पेट्रोल इंजिनमध्ये लॉन्च करत आहे. नव्या वॅगन आरमध्ये १.० लीटर आणि १.२ लीटर पेट्रोलचं इंजिन असेल. दोन्ही इंजिनच्या ऑप्शनमध्ये V आणि Z व्हेरिएन्टमध्ये AMT गिअरबॉक्स मिळेल. काही मीडिया रिपोर्टसनुसार, मारुती सुझुकी वॅगन आरचं नवं मॉडेल आत्ताच सीएनजी स्वरुपात बाजारात आणणार नाही.


कशी असेल नवी वॅगन आर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या वॅगन आरच्या फ्रंट हेडलॅम्पचं डिझाईन बदललेल्या स्वरुपात असेलच. इंटिरिअर डिझाईनही सद्य मॉडेलहून वेगळं आहे. ते 'बीज ऍन्ड ब्राऊन कलर थीम'मध्ये देण्यात आलंय. सेंटर कंन्सोलमध्ये टचस्क्रीन इन्फोटेन्मेट सिस्टम देण्यात आलंय. स्पीडोमीटरही वेगळ्या पद्धतीचा देण्याता आलाय. याला Heartect प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलंय.


असं असेल इंजिन


वॅगन आरमध्ये ड्युएल एअरबॅग असण्याची शक्यता आहे. एबीएस ईबीडीसोबतच रिअर पार्किंग सेन्सर, ड्रायव्हर सीट बेल्ट अलर्ट देण्यात आलाय. इंजिनमध्ये १.० लीटर K-Series इंजिन ६७ PS पॉवर जनरेट करेल तर १.२ लीटर K-Series ८२ PS पॉवर जनरेट करेल. गिअर बॉक्स ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत असेल आणि AMT ही असेल.


कुणाशी असेल स्पर्धा?


मारुती सुझुकीची ही नवी गाडी इतर गाड्यांसाठी बाजारात मोठी स्पर्धा निर्माण करणार असं दिसतंय. खासकरून नुकत्याच लॉन्च झालेल्या ह्युंडईच्या नव्या सॅन्ट्रो या गाडीला जोरदार टक्कर मिळेल. ह्यंडईनं नवी सॅन्ट्रो कार नव्या स्वरुपात सादर केलीय. कंपनीनं आपलं 'आय १०' मॉडल बंद करून एक नवीन आणि जबरदस्त प्लॅटफॉर्म तयार केलाय.