मुंबई : भारतीय रस्त्यावर धावणारी, तसेच कमी किंमतीची मारुती ऑल्टो ८०० चं प्रॉडक्शन २०१९ मध्ये बंद होणार आहे. मारुती ऑल्टो ८०० चं उत्पादन २०१९ च्या सहाव्या महिन्यापर्यंत पूर्णपणे बंद होणार आहे. याआधी काही दिवसापूर्वी अशी बातमी आली होती की, २०२० पासून मारुती ओमनीचं प्रॉडक्शन बंद करण्यात येणार आहे.


मारुती ऑल्टो ८०० ची निर्मिती बंद होण्यामागचं कारण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सरकार जुलै २०१९ पासून नवीन क्रॅश चाचणी नियम लागू करणार आहे. या नियमाला अनुसरून पुढील गाड्यांची निर्मिती करण्यात यावी, म्हणून कंपनी Maruti 800 चा संपूर्ण जुना स्टॉक संपवण्याच्या बेतात आहे. मारुती सुझुकी २०२० पर्यंत BS-VI नियमात बसणाऱ्या इंजीनाची गाडी लॅान्च करण्याचा विचार करत आहे. यामुळेच कंपनी ओमनी आणि मारुती ऑल्टो ८००ची निर्मिती बंद करणार आहे.  


आताची निर्मिती भविष्यातील मानांकनाशी अनुरूप नाही 


'कार अॅण्ड बाईक'च्या अनुसार मारुती सुझुकीच्या सिनिअर व्हॉईस प्रेसिडेंट- इंजीनिअरिंग, रिसर्च, डिझाइन अॅन्ड डेव्हलपमेंट दीपक सावकर म्हणाले, जे मॅाडेल भविष्यातील मानांकनाशी अनुरूप नाही, अशा गाड्यांचे प्रॉडक्शन बंद केलं जाणार आहे. ओमनी आणि ऑल्‍टो ८०० यांचं प्रॉडक्शन सुरक्षित मानकांमुळे तसेच एमिशन नियमांमुळे बंद करण्यात येणार आहे.


सावकर यांनी सांगितले की, कंपनीची ६० टक्के निर्मिती लाईनअप भारत न्यू व्हेईकल सेफ्टी एसेन्समेन्ट प्रोग्रॅाम (BNVSAP)ला पूर्ण करतात. २०१२ मध्ये ऑल्टो ८०० ने मारुती ८००ला रिप्लेस केल होतं.  कंपनी ने २०१६ मध्ये ऑल्टो ८०० ला फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये लॉन्च केलं होतं.