Maruti Suzuki Wagon R All Model Price: मारुति सुझुकीची वॅगर आर गाडी घेण्याचा तुमचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मारुति सुझुकी वॅगन आरचा मायलेज चांगला आहे. काही जण मारुति सुझुकी वॅगन आर सीएनजी वापरतात. त्यामुळे ही गाडी चालवणं परवडतं आणि खर्च बाइकइतका येतो, असं कारप्रेमींचं म्हणणं आहे. वॅगन आर सीएनजीचा मायलेज 34.05 किमी प्रति किलो आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. मारुति वॅगनआरचे एकूण 11 व्हेरियंट आहेत. त्यामुळे जर तुम्हाला मारुति वॅगन आर गाडी विकत घ्यायची असेल तर प्रत्येक व्हेरियंटची किंमत माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या बजेटनुसार मारुति वॅगन आरचं योग्य व्हेरियंट निवडू शकाल. चला तर मग जाणून घेऊयात प्रत्येक व्हेरियंटची किंमत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुति सुझुकी वॅगन आरची किमते


  • Maruti Suzuki Wagon R  Tour H3 - रु 544500 (एक्स-शोरूम)

  • Maruti Suzuki Wagon R  LXI 1.0L- रु 547500 (एक्स-शोरूम)

  • Maruti Suzuki Wagon R  VXI 1.0L- रु 591000 (एक्स-शोरूम)

  • Maruti Suzuki Wagon R  ZXI 1.2L- रु 609600 (एक्स-शोरूम)

  • Maruti Suzuki Wagon R  Tour H3 CNG - रु. 639500 (एक्स-शोरूम)

  • Maruti Suzuki Wagon R  VXI AGS 1.0L- रु 641000 (एक्स-शोरूम)

  • Maruti Suzuki Wagon R  LXI CNG 1.0L- रु 642500 (एक्स-शोरूम)

  • Maruti Suzuki Wagon R  ZXI+ 1.2L- रु 658000 (एक्स-शोरूम)

  • Maruti Suzuki Wagon R  ZXI AGS 1.2L- रु 659600 (एक्स-शोरूम)

  • Maruti Suzuki Wagon R  VXI CNG 1.0L- रु 686000 (एक्स-शोरूम)

  • Maruti Suzuki Wagon R ZXI+ AGS 1.2L- रु 708000 (एक्स-शोरूम)


मारुति वॅगनआरचं सर्वात स्वस्त मॉडेल हे Tour H3 असून सर्वात महाग मॉडेल ZXI+ AGS आहे. यात दोन इंजिन पर्याय असून मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते.