नव्या वर्षात कारप्रेमींना दणका; मारुती सुझुकी कंपनीचा मोठा निर्णय
Maruti Suzuki Price Hike: नव्या वर्षात कार खरेदी करण्य़ाच्या विचारात असाल तर, तुम्हाला झटका लागू शकतो. कारण, खर्च करावे लागणार जास्तीचे पैसे.
Maruti Suzuki Price Hike: भारतामध्ये काही ब्रँडच्या कारना विशेष पसंती दिली जाते. देशातील रस्त्ये, इथले इंधन दर, कारप्रेमींची वाहन चालवण्याची शैली या आणि अशा अनेक मुद्द्यांना अनुसरून बहुतांश कंपन्या साजेसे मॉडेल बाजारात आणले. यापैकी काहींना दणकून पसंती मिळाली, तर काही मात्र फसले. यात बऱ्याच अंशी यश मिळालं ते म्हणजे मारुती सुझुकी या कार उत्पादक कंपनीला. पण, आता याच कंपनीनं असंख्य कारप्रेमींना दणका दिला आहे.
पुढच्या वर्षापासून म्हणजेच 2024 पासून मारुती सुझुकीकडून कारच्या दरांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून ही दरवाढ लागू असेल. माध्यमांना संबोधित करत जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये कंपनीनं याबाबतची माहिती दिली. जिथं कमोडिटी प्राईज आणि उत्पादनासाठी लागणारी किंमत वाढल्यामुळं कारच्या दरांमध्येही वाढ झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आली.
हेसुद्धा वाचा : तुम्ही जेवणात कोणतं तेल वापरता? 180 रुपयांचं 'हे' तेल वापरून पाहाच
कारच्या विविध मॉडेल्सची निर्मिती करत असताना सातत्यानं उत्पादनासाठी लागणारे खर्च नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करुनही काही कारचे दर मात्र गगनाला भिडले. ज्यामुळं ही दरवाढ लागू करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार येत्या काळात मारुतीकडून सरसरकट सर्वच कारच्या दरांमध्ये वाढ केली जाऊ शकते. आता कंपनीकडून सरसकट मॉडेल्सवरील वाढीच्या अधिकृत घोषणेकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरवाढ आणि इतर हिशोब
Maruti Suzuki कडून 1 एप्रिल 2023 ला कारच्या दरांमध्ये 0.8 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यामागोमाग आता 2024 मध्येही ही दरवाढ लागू करण्यात येणार असल्याची चिन्हं आहेत. त्याशिवाय येत्या काळात इतरही कार कंपन्या अशाच पद्धतीची दरवाढ लागू करु शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुळात एखाद्या कार उत्पादक कंपनीकडून वर्षणखेरीस कारच्या दरांमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा करणं ही नवी बाब नाही. कारण, बहुतांश कार कंपन्या सरत्या वर्षअखेरी आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला ही दरवाढ घोषित करत असतात. बऱ्याचदा ही दरवाढ किमान असते. पण, मारुतीकडून करण्यात येणाऱ्या दरवाढीमध्ये कारच्या किमती 20 हजार रुपयांनी वाढताना दिसतात. तेव्हा आता नव्या वर्षासाठी कंपनीकडून ही दरवाढ नेमकी किती रुपयांनी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल.