मुंबई : ऑगस्टमध्ये मारुती सुझुकी डझायरने 'बेस्ट सेलिंग कार' बनण्याचा विक्रम नोंदविला आहे. मारुती सुझुकीने आता आणखी एक नवे शिखर गाठत भारतीय बाजारपेठेत जोरदार लोकप्रियता मिळविली आहे.लॉन्चिंगनंतर २० लाख कार्सची विक्री झाली आहे. वॅगनारचे पहिले मॉडेल १९९९ साली भारतात सुरू करण्यात आली. गेल्या १० वर्षांपासून भारतातील सर्वोत्कृष्ट विक्री होणाऱ्या बेस्ट ५ कारमध्ये हिचा नंबर लागतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान नव्या फिचर्सची कॉम्पॅक्ट हॅचबॅक कार ग्राहकांना आकर्षित करण्यात अधिक यशस्वी ठरली आहे. २०११ नंतर ६ वर्षांत या गाडीने १० लाख विक्रीचा आकडा पार केला आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजीतदेखील उपलब्ध आहे. याची किंमत ४.१ लाखांपासून सुरू होऊन ४.८३ लाखांपर्यंत (एक्स-शोरूम, दिल्ली)  आहे. सर्वात कमी किमतीची एलएक्सआय (पेट्रोल) कारमध्ये ९९८ सीसी पेट्रोल इंजिन आहे. इंजिनने ६७ बीएचपी आणि ९० एनएम च्या टॉर्कची क्षमता निर्माण करते. कंपनीच्या ही कार २०.५१ किमीचे मायलेज देत आहे.