मारुतीने लॉन्च केली नवी कार, SUV JIMNY....
एसयूवीच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता आहे. देशाच्या सर्वात मोठ्या कार कंपनीने एसयूवी ब्रीजा (BREZZA)च्या यशानंतर अजून एक नवीन कार भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.
नवी दिल्ली : एसयूवीच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता आहे. देशाच्या सर्वात मोठ्या कार कंपनीने एसयूवी ब्रीजा (BREZZA)च्या यशानंतर अजून एक नवीन कार भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.
लवकरच लॉन्च होणार ही कार...
मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी लवकरच देशात कॉम्पॅक्ट SUV जिम्नी (JIMNY)लॉन्च करेल. परंतु, भारतीय बाजारात लॉन्च होण्यापुर्वी कॉम्पॅक्ट SUV जिम्नी मोटार शो २०१८ मध्ये सादर केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. मात्र कंपनीतर्फे याची कोणतीही माहीती देण्यात आली नाहीये.
कारचा फर्स्ट लूक
फर्स्ट लूकमध्ये कार अतिशय दमदार दिसत आहे. यात समोर सर्कुलर हॅडलॅम्प आणि बाजूला रुंद व्हील असलेले आर्च देण्यात आले आहेत. त्याचबरोबर १.२ लीटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. जिम्नीमध्ये ६ सीट असण्याची आशा केली जात आहेत.
मारुती जिम्नीमध्ये १.० लीटरचे बूस्टरजेट टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात येईल. जिम्नीच्या जुन्या मॉडलमध्ये इंजिनला ५-स्पीड मॅन्युअल आणि ४-स्पीड ऑटोमेटिक गियरबॉक्सने जोडले गेले होते. त्याचबरोबर १.३ लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले होते. मात्र या नवीन जिम्नीमध्ये ऑटोमेटिक ट्रांसमिशन होईल की मॅन्युअल हे अजून कळू शकलेले नाही.
जिम्नीचे इंटिरियर
बाहेरून मात्र ही कार अतिशय दमदार दिसते. जिम्नीचे इंटिरियर जिप्सीशी मिळतेजुळते आहे. जिम्नीचे ऑटो क्लाइमेट कंट्रोल यूनिट मारुती स्विफ्ट तर फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हीलला मारुतीच्या डिजाईनने प्रेरित झालेले आहे. याशिवाय जिम्नीमध्ये ७.० इंचाचा स्मार्टप्ले इंस्ट्रूमेंट क्लस्टर देखील आहे.
कारची किंमत
मारुती या कारमध्ये सुरक्षेसाठी मल्टीपल एयरबॅगची सुविधा देण्यात आली आहे. मारुती सुझुकी जिम्नीची किंमत ६.५ लाखापासून सुरू होईल, अशी आशा आहे. एसयूवी कारची स्पर्धा भारतीय बाजारात महिंद्रासोबत होण्याची शक्यता आहे.