नवी दिल्ली : मर्सिडीज-बेंझने भारतात आपल्या दोन कार्स लॉन्च केल्या आहेत. मर्सिडीज AMG GT-R ची किंमत २.२३ कोटी आणि Mercedes-AMG रोडस्टर या कारची किंमत २.१९ कोटी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लूक्सच्या बाबतीत सांगायचं तर कार अतिशय सुंदर करण्यात आली आहे. मर्सिडीज AMG GT R एक स्पोर्ट कूप आहे. या कारला ‘बीस्ट ऑफ ग्रीन हेल’ या नावानेही ओळखलं जातं. ही कार कंपनीची AMG GT S वर बेस्ड आहे. 


मर्सिडीज AMG GT रोडस्टरमध्ये कंपनीने AMG 4.0- लीटरचं V8 ट्विन टर्बिचार्ज्ड इंजिन दिलं आहे. हे इंजिन ४६९ bhp पावर आणि ६३० Nm टॉर्क जनरेट करतं. या कारची टॉप स्पीड ३०२ किमी/तास आहे. 


मर्सिडीज AMG GT R केवळ आणि केवळ ३.५ सेकंदातच ० ते १०० किमीचा वेग पकडते आणि कंपनीचा दावा आहे की, या कारची टॉप स्पीड ३१८ किमी/तास आहे. नव्या मर्सिडीज AMG GT R या कारच्या इंजिनला ७ स्पीड ड्य़ूल क्लच गिअरबॉक्स देण्यात आलाय. गिअर शिफ्टींग वेगाने व्हावं यासाठी गिअरबॉक्सला खास तसंच तयार करण्यात आलंय. 


या कार्सच्या इंटेरिअरबद्दल बोलाल तर या गाडीत पिवळे सीट बेल्ट्स, ग्लॉस ब्लॅक ट्रिम, ग्लॉस ब्लॅक शिफ्ट पॅडल्स आणि आकर्षक स्टीअरींग व्हिल दिलंय. मर्सिडीजच्या या कारचं कॅबिनही अतिशय आकर्षक करण्यात आलंय. गाडीच्या आत तुम्हाला एएमजी स्पोर्ट्स बकेट सीट्स मिळतील. ज्या नापा लेदरने तयार करण्यात आल्या आहेत.