मुंबई: Whatsapp सतत्याने आपल्या ग्राहकांसाठी नवीन फीचर्स आणत असतं. लोकांनी Whatsapp प्लस सोडून मूळ Whatsapp कडे परतावे यासाठी प्रयत्न सुरू आहेक. वॉईस मेसेज प्रीव्हिव्यू आणि त्यासोबत काही नवीन फीचर्स नुकतेच आणले आहेत. आता अजून एक उपयुक्त फीचर लवकरच येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WABetaInfo च्या नवीन अहवालानुसार, iOS वर अॅपची नवीनतम बीटा व्हर्जनमध्ये एक अपडेट येणार आहे. यामध्ये आता तुम्हाला रिप्लाय प्रत्येकवेळी द्यावा लागणार नाही. तर ऑटोमॅटिकली तो रिप्लाय जाऊ शकतो. 


याआधी इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजर सिस्टिमला जोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला  आहे. आता Whatsapp देखील जोडण्यावर काम सुरू आहे. थोडक्यात सांगायचं तर क्रॉस प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार आहे. एक मेसेज तुम्ही मेसेंजर आणि इन्स्टाग्राम मेसेज दोन्हीकडे पाठवू शकणार आहात. 



तुम्हाला जो मेसेज आला आहे त्यावर तुम्हाला आता रिअॅक्शन देता येणार आहे. ज्याप्रमाणे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील मेसेजला तुम्हाला प्रत्येक मेसेजवर रिअॅक्शन देण्याची मुभा आहे. तशाच पद्धतीनं आता Whatsapp साठी रिअॅक्शन अपडेट येणार आहे. हे फीचर लवकरच तुम्हाला मिळू शकतं.