मुंबई : Xiaomi कंपनीने अखेर त्यांचा बहुप्रतिक्षित  Mi 10 5G भारतात लॉन्च केला आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा स्मार्टफोन असल्याचं सांगण्यात येत आहे. एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये हा शानदार फोन लॉन्च करण्यात आला आहे. शिवाय फोनच्या  फीचर्स आणि किंमतीची घोषणा केली. 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला शानदार स्मार्टफोन  मध्ये चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप, 5G सपोर्ट, 3D कर्व्ह्ड डिस्प्ले , क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे. या फोनची फोनसाठी प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना कंपनीकडून 2,500 रुपये किंमतीची एमआय वायरलेस पावरबँक मोफत मिळणार आहे.  अ‍ॅमेझॉन आणि Mi.com च्या वेबसाइटवर प्री-ऑर्डरला सुरूवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Xiaomi Mi 10 5G किंमत


Mi 10 5G- 8 जीबी रॅम आणि 128 जीबी-  49,999 रुपये
Mi 10 5G- 8 जीबी रॅम आणि 256 जीबी -  54,999 रुपये


Mi 10 5G स्मार्टफोनचे फीचर्स :-
-  6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) डिस्प्ले
-  ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट
-  मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सल, दुसरा 13 मेगापिक्सल वाइड-अँगल लेन्स, तर अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सल
-  सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी  20 मेगापिक्सल
- Mi 10 मध्ये 4,780 एमएएच क्षमतेची फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली बॅटरी


महत्त्वाचं भारतात अद्याप 5G कनेक्टिव्हिटीची सुरूवात झाली नसल्यामुळे भारतीयांना हा फोन 4G कनेक्टिव्हिटीवरच वापरावा लागणार आहे.