मुंबई : मायक्रोमॅक्सने भारतात आपला भारत सीरिजचा भारत गो स्मार्टफोन लाँच केला आहे. मायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत 4,399 रुपये ठेवली आहे. मायक्रोमॅक्सने 'मेरा पहिला स्मार्टफोन' वर 2000 कॅशबॅक देण्यासाठी एअरटेलसोबत डील केली आहे. या स्मार्टफोनची किंमत 2,399 रुपये असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एंड्रॉयड गो गूगलकडून स्मार्टफोनकरता तयार करण्यात आलेलं ऑपरेटिंग सिस्टम आहे. डेटा वाचवण्यासाठी खास तयार करण्यात आलं आहे. हे जीमेल गो, मॅप्स गो, फाइल्स गो, क्रोम, यूट्यूब गो, असिस्टेंट गो, प्ले स्टोर आणि जीबोर्डसारखे प्रीलोडेड अॅप्ससोबत येणार आहे. 


स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर VoLTE सपोर्ट भारत गो एंड्रॉयड ओरियोवर चालत आहे. यामध्ये 4.5 इंच TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 1 GB रॅम, Mali - T720 MP1, GPU आणि 8 GB स्टोरेजसोबत 1.1 GHz Media Tek MT6737 क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आलं आहे. यासोबत इंटरनल मेमोरी कार्डाच्या मदतीने 32 GB पर्यंत वाढवू शकतात.