नवी दिल्ली : स्मार्टफोन प्रेमींसाठी एक चांगली आणि आनंदाची बातमी आहे. कारण, मायक्रोमॅक्स कंपनीने आपले तीन धमाकेदार फोन्स लॉन्च केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायक्रोमॅक्सने 'Bharat' नावाने एक नवी सीरिज सुरु केली होती. काही दिवसांपूर्वी कंपनीने ३,४९९ रुपयांत 'भारत-२' हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. 'भारत-२' या स्मार्टफोनच्या यशानंतर आता मायक्रोमॅक्सने आपल्या वेबसाईटवर 'भारत-२ प्लस', 'भारत-३' आणि 'भारत-४' हे स्मार्टफोन्स स्पेसिफिकेशन आणि फिचर्ससोबत लिस्ट केले आहेत.


मात्र, कंपनीने या फोन्सची किंमत अद्याप जाहीर केलेली नाहीये. या तीन फोनपैकी कुठल्या फोनचे फिचर्स कसे आहेत आणि स्पेसिफिकेशन्स काय आहेत यावर एक नजर टाकूयात...


भारत-२ प्लस


मायक्रोमॅक्सने दिलेल्या माहितीनुसार, भारत-२ प्लस या फोनची स्क्रिन ४ इंचाची आहे. हा स्मार्टफोन क्वाड कोर प्रोसेसरवर चालेल. या फोनमध्ये ५ मेगापिक्सल रियर कॅमेरा आहे तर २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये १६००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तर, १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.


भारत-३


भारत-२ प्लससोबतच कंपनीने भारत-३ हा फोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये ४.५ इंचाचा WVGA TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. ८ जीबी स्टोरेज असून तो ३२ जीबीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. हा फोनला २०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तर ५ मेगापिक्सेलचा फ्रंट आणि रियर कॅमेरा आहे.


भारत-४


मायक्रोमॅक्सच्या भारत सीरिजमध्ये भारत-४ हँडसेट सर्वात चांगला आहे. या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा एचडी टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनला मीडियाटेक MT६७३७M प्रोसेसर देण्यात आला आहे. १ जीबी रॅम असून इंटरनल स्टोरेज १६ जीबी आहे. तसेच ५ मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.