मुंबई : कम्प्युटर शिकताना पहिल्यांदाच हाताळ जातं ते पेन्ट, आता ते पेन्ट विंडोजमधून काढलं जाणार आहे. अगदी बालकांपासून ते जेष्ठांमध्ये विंडोजमध्ये सर्वात लोकप्रिय फीचर असलेल्या एमएस पेंटची मायक्रोसॉफ्टने साथ सोडली आहे.  विंडोजच्या पहिल्या व्हर्जनपासून गेली ३२ वर्षे साथ देणार फीचर अखेर काढून टाकण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आऊटलुक एक्सप्रेस, रिडर अॅप, रिडिंग लिस्ट यासारखे फीचरही वगळणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे. मायक्रोसॉफ्टकडून विंडोज १० अपडेटच्या निमित्ताने हे डेस्कटॉपचे फीचर वगळण्यात येणार आहे, अशी घोषणा करण्यात आली आहे. यापुढे या सॉफ्टव्हेअरसाठी कोणतीही देखभाल किंवा याचा विकास होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. एमएस पेंटसोबतच आणखी काही फीचर्सही वगळण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. 


थर्ड डायमेंशनल इमेज तयार करण या फीचरचा भाग होता. एमएस पेंटनंतर एडॉब फोटोशॉप हे लोकप्रिय व्हर्जन आहे खर, पण एमएम पेंटच्या निमित्ताने असणारा नोस्टॅलजियाच आहे खरा. अगदी तीन वर्षाच्या चिमुरड्यापासून ते आपल्या जेष्ठ नागरिकांना हाताळायला सोप अस हे सॉफ्टव्हेअऱ सोप होत. ट्विटरकरांनीही एमएस पेंट सॉफ्टव्हेअरसाठी मोठ्या प्रमाणावर ट्विटस केल्या आहेत.


मायक्रोसॉफ्टने १९८५  मध्ये पहिल विंडोज व्हर्जन आणल होत. तीस वर्षाहून अधिक साथ देणाऱ्या सॉफ्टव्हेअरची आता साथ सोडण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. गेल्याच वर्षी मायक्रोसॉफ्टच्या रडावर एमएस पेंट हे सॉफ्टव्हेअर होत. त्यामुळेच कंपनीने थ्री डी पेंटच अद्ययावत अस फीचर विंडोजसाठी दाखल केले.