आता होईल अतिशय योग्य भाषांतर...
मायक्रोसॉफ्टच्या संशोधकांनी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित केली आहे.
वाशिंग्टन : मायक्रोसॉफ्टच्या संशोधकांनी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे चीनी भाषेतून इंग्रजीत भाषांतर करणे सोपे जाणार आहे. हे भाषांतर एखादा माणूस करेल तितके योग्य असेल.
नवे पाऊल
हे सॉफ्टवेअर म्हणजे ट्रान्सलेशनच्या दिशेने उचललेले नवे मोठे पाऊल आहे. त्याचबरोबर त्या अजून काही नवे बदल करता येतील का ज्यामुळे अधिक चांगले भाषांतर होईल, अशा दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
या कामांमध्येही मदत
मायक्रोसॉफ्टच्या या यशामुळे इतर अन्य भाषेतून भाषांतर करणे अधिक सोपे होईल. या तंत्रज्ञानाचा वापर भाषांतराऐवजी कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यांमध्ये करता येईल.