नवी दिल्ली : जिओ ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ सध्या आपल्या ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफर्स उपलब्ध करुन देत आहे. पाहूयात काय आहे जिओची नवी आधमाकेदार ऑफर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑगस्ट महिन्यात ज्या युजर्सने आपला फोन रिचार्ज केला होता. त्यांच्या रिचार्जची वैधता हळूहळू संपत आहे. येत्या काही दिवसांत जवळपास सर्वच युजर्सच्या प्लानचे ८४ दिवस पूर्ण होतील. त्यामुळे जिओ युजर्सला आपल्या सेवेचा लाभ घेण्यासाठी रिचार्ज करावं लागणार आहे.


रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच ट्रिपल कॅशबॅक ऑफर सादर केली होती. तर, दुसरीकडे जिओच्या रिचार्जवर अनेक ऑनलाईन रिचार्ज आणि वॉलेट कंपन्या मोठी कॅशबॅक ऑफर देत आहेत. सर्वाधिक कॅशबॅक मोबिक्विक (Mobikwik) ही कंपनी देत आहे.


मोबिक्विकवर जिओच्या ३९९ रुपयांच्या रिचार्जवर ३०० रुपयांचा सुपरकॅश मिळत आहे. म्हणजेच जिओ युजर्सला हा रिचार्ज अवघ्या ९९ रुपयांत मिळत आहे.


असा मिळेल ३०० रुपयांचा सुपरकॅश


ज्या युजर्सकडे मोबिक्विक अॅप नाहीये त्यांनी Mobikwik इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर रजिस्टर करावं लागेल. मग, हे अॅप PAYBACK पिन मागेल ही स्टेप तुम्ही SKIP करु शकता.


मोबाईल रिचार्ज ऑप्शन करा सिलेक्ट


फोन नंबर रजिस्टर झाल्यानंतर मोबाईल रिचार्जच्या ऑप्शनवर जा. मग, तुमचा फोन नंबर इंन्सर्ट करुन ऑपरेटर आणि सर्कल सिलेक्ट करा. त्यानंतर रिचार्ज करण्याची रक्कम टाका. तुम्हाला ३०० रुपयांच्या कॅशबॅकसाठी ३९९ रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचं रिचार्ज करावं लागेल.


प्रोमोकोड सिलेक्ट करा


प्लान सिलेक्ट केल्यानंतर खालच्या बाजुला प्रोमोकोड ऑप्शन येईल. त्याठिकाणी NEWJIO कोड टाका. कोड अप्लाय करताच कॅशबॅकची माहिती तुमच्या समोर येईल. यामध्ये सुपरकॅशची माहितीही असेल. कॅशबॅकच्या माहितीनंतर पेमेंट ऑप्शनसाठी प्रोसेस करा. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करु शकता.


रिचार्ज होताच मिळणार सुपरकॅश


रिचार्ज होताच तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येईल. तसेच अॅपवर ३०० रुपयांचा कॅशबॅक मिळाल्याचा मेसेज येईल. ट्रान्झॅक्शन आयडी ही दिली जाईल. काही वेळातच तुमच्या अॅपमध्ये ३०० रुपयांचं सुपरकॅश अपडेट होईल. याचा वापर तुम्ही बिल पेमेंट किंवा शॉपिंग करण्यासाठी करु शकता.