मुंबई : स्मार्टफोन जसा-जसा जुना होत जातो तसा तो स्लो होत जातो. पण फक्त मोबाईल जुना असणे हेच मोबाईल हँग (Mobile Hang) होण्याचं कारण नाही. तर काही अॅप(Apps) देखील याला कारणीभूत असू शकतात. जे तुमच्या फोनच्या स्टोरेजमध्ये राहतात. डाऊनलोड करताना जे अॅप 40 ते 50 एमबीचे असतात. पण नंतर ते फोनमध्ये 400 ते 500 एमबीची जागा व्यापतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असे अॅप कसे ओळखावे. आज याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. काही स्टेप्स फॉलो करुन तुम्ही ही समस्या सोडवू शकतात.


कोणते App फोन करतात स्लो?


1. सगळ्यात आधी मोबाईल सेटिंगमध्ये जा.
2. स्टोरेज/मेमरीच्या ऑप्शनमध्ये जा.
3. स्टोरेज लिस्ट ओपन झाल्यानंतर कोणता कंटेंट तुमच्या मोबाईलचा अधिक जागा व्यापतो.
4. यामध्ये तुम्हाला इंटरनल मेमरीबाबत ची माहिती ही मिळेल.
5. मेमरीवर क्लिक करा. त्यानंतर Memory used by apps वर जा.
6. आता RAM च्या 4 इंटरवल्स (3 घंटे, 6 घंटे, 12 घंटे आणि 1 दिवस) मध्ये वापरली गेलेली मेमरीची माहिती मिळेल.
7. आता तुम्हाला दिसेल की कोणता अॅप तुमचा मोबाईल अधिक स्लो करतोय.
8. जर तो अॅप कामात नसेल तर त्याचा Cache क्लिअर करा अन्यथा डिलीट करा.


Lite व्हर्जन अॅपचा वापर करावा


मोबाईल स्लो होत असल्याने Apps च्या Lite Version चा वापर करावा. यामुळे तुमच्या फोनची स्पीड वाढेल. फोन हँग देखील होणार नाही. फेसबुक, मॅसेंजर, इंस्टाग्राम या अॅपचं लाईट व्हर्जन देखील तुम्हाला मिळतं.