मुंबई : 'ओप्पो'नं भारतातील मार्केट हेरून जेव्हा भारतीय बाजारात प्रवेश केला तेव्हा ऑफलाईन खरेदीला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता... परंतु, काही वेळातच ही परिस्थिती बदलली... विशेषत: शाओमीनं बदललेल्या मार्केटची मानसिकता हेरून ऑनलाईन मार्केटिंग जोरात सुरू केली... आणि मार्केटवर वर्चस्व मिळवलं. आता, ओप्पो या कंपनीचा RealMe 1 या आपल्या नव्या कोऱ्या फोनच्या माध्यमातून याच मार्केटवर ताबा मिळवयाचा प्रयत्न आहे. RealMe 1 मध्ये केवळ दमदार स्पेसिफिकेशन्सच नाहीत तर त्याच्या किंमतीही या प्रकारच्या स्मार्टफोनपेक्षा कमी आहेत. RealMe 1 ची डिझाईन Oppo F7शी मिळती-जुळती आहे. वजनाला अतिशय हलका असा हा हॅन्डसेट आहे. उल्लेखनीय म्हणजे, या फोनची बॉडी ग्लासची नसून प्लास्टिकची आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, RealMe 1 चं मागचं कव्हर १२ लेअर नॅनोटेक कम्पोजिट मटेरिअलचं बनलंय. ते 10nm टायटेनियम आणि 20 nm निओबिअम ऑक्साईडनं पॉलिश करण्यात आलंय... त्यामुळे त्याला आकर्षक असा शीन मॅटेलिक लूक मिळतो. 


RealMe 1ची वैशिष्ट्ये... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- डिस्प्ले : ६ इंचाची FHD + IPS स्क्रीन


- ऑपरेटिंग सिस्टम : अॅन्ड्रॉईड ८.१ वर आधारित ColorOS 5.0 


- बॅटरी : ३४१० mAh बॅटरी 


- रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, LED फ्लॅशसहीत... याचं अॅपर्चर f/2.2 आहे


- फ्रंट कॅमेरा : f/2.2 अॅपर्चरसहीत ८ मेगापिक्सल कॅमेरा


- AI शॉट - AI शॉटचा RealMe 1 मध्ये समावेश करण्यात आलाय. AI शॉट चेहऱ्याचे २९६ फेशिअल पॉईंट कॅप्चर करू शकतो. 


- रॅम : ३ जीबी / ४ जीबी / ६ जीबी


- इनबिल्ट स्टोअरेज : ६ जीबी रॅम व्हेरिएन्टमध्ये १२८ जीबीचं इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आलंय... जे २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकेल.


- रंग : सोलर रेड आणि डायमंड ब्लॅक अशा दोन रंगांत हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.


किंमत 


- ३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोअरेज : ८,९९९ रुपये


- ४ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोअरेज : १०,९९० रुपये


- ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोअरेज : १३,९९९ रुपये


४ जीबी रॅमचं व्हेरिएन्ट येत्या महिन्यात लॉन्च होईल. हा फोन तुम्ही Amaxon.in वरून तुम्ही विकत घेऊ शकाल. इथे ग्राहकांसाठी काही ऑफर्सही उपलब्ध आहेत.