नवी दिल्ली : दूरसंचार नियामक 'ट्राय'कडून, ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत ग्राहक मोबाईल नंबर पोर्टेबलिटीसाठी अर्ज करु शकणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. ११ नोव्हेंबरपासून नवी आणि अधिक सरळ पोर्टेबलिटी सुविधा सुरु होत असल्याने, ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान पोर्टेबलिटीसाठी कोणताही अर्ज करता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या (ट्राय) अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नवीन प्रणालीनुसार, मोबाईल नंबर पोर्टेबलिटीची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण होईल. तर सर्कल टू सर्कल मोबाईल नंबर पोर्टेबलिटीसाठी पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे.


नवीन प्रणालीनुसार, मोबाईल नंबर पोर्टेबलिटीची प्रक्रिया अधिक गतिमान, सोपी आणि सरळ होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी कमी वेळ लागणार आहे. सध्या ही प्रक्रिया पूर्ण होण्यास सात दिवसांचा कालावधी लागतो. 


४ नोव्हेंबर २०१९ संध्याकाळी ६ वाजल्यापासून १० नोव्हेंबरपर्यंत मोबाईल नंबर पोर्टेबलिटीसाठीचे अर्ज घेण्यात येणार नसल्याचं ट्रायकडून सांगण्यात आलं आहे. मोबाईल नंबर पोर्टेबलिटीसाठीची नवीन प्रणाली ११ नोव्हेंबर २०१९पासून अंमलात येणार आहे.