नवी दिल्ली : उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या गरमीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. जनतेला या त्रासातून वाचवण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला आहे. मोदी सरकारच्या नव्या योजनेनुसार घराघरात एसी पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बाजारातील किंमतीपेक्षा स्वस्त दरात एसी विकत घेण्याची संधी यामाध्यमातून मिळणार आहे. हा नवा एसी बाजारमुल्यापेक्षा 15 ते 20 टक्के स्वस्त असणार आहे. त्यामुळे एसीची किंमत तुमच्या बजेटमध्ये असून यातून तुमचा वीज खर्च कमी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घर बसल्या एका क्लिकवर हा एसी खरेदी करता येणार आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा घेऊ शकता. यातून जुना एसी बदलाताही येऊ शकतो. यामुळे विजेच्या बिलात साधारण 35 ते 40 टक्के कपात होऊ शकते. पुढच्या एक ते दीड महिन्यात सरकार ही सुविधा देणार आहे. हा एसी खराब झाल्यानंतर तुम्हाला कंपन्यांच्या फेऱ्या मारण्याच्या गरज लागणार नाही. एलजी, पॅनॉसॉनिक, ब्लू स्टार, गोदरेज साऱख्या कंपन्या एसी विक्रीच्या स्पर्धेत आहेत. एकदा बुकींग केल्यानंतर 24 तासांच्या आत याची डिलीव्हरी मिळणार आहे. तसेच एका दिवसात घरी एसी लावूनही दिला जाईल.



यासाठी सरकारी कंपनी EESL ही जुलैपासून सर्वसाधारण ग्राहकांसाठी एसी उपलब्ध करेल. कंपनीने पुढच्या 2 वर्षात 2 लाख एसी बनविण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. ज्यांच्यानावे वीजेचे कनेक्शन असेल अशांनाच हा एसी घेता येऊ शकणार आहे. EESl या कंपनीने देशातील कित्येक घरांमध्ये स्वस्त LED बल्ब आणि ट्यूबलाईट उपलब्ध केल्या आहेत. आता घराघरात स्वस्त एसी पोहोचविणे हे कंपनीचे लक्ष्य आहे. या कंपनीने स्वस्त ट्यूबलाईट आणि पंखे विक्रीचे काम वीज देणाऱ्या Discom या कंपनीसोबत मिळून केले आहे.