नवी दिल्ली : प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह आहेत. यात बॉलिवूड स्टार, मराठी कलाकार यांचा समावेश आहे. तर आता या राजकीय नेते मागे नाहीत. व्हॉटसअॅप, फेसबुक, टिकटॉक तरुणांमध्ये लोकप्रिय आहेच तसेच इन्स्टाग्राम. इन्स्टाग्राम या लोकप्रिय फोटो शेअरिंग अॅपवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात जास्त फॉलोअर्स असल्याची माहिती समोर आली आहे. जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्धीचा आणखी एक नवा विक्रम नोंदवला आहे. मोदी इन्स्टाग्रामवर जगात सर्वात जास्त फॉलोअर्स असणारे नेते बनले आहेत. मोदींच्या ऑलोअर्सची संख्या तीन कोटींच्या घरात गेली आहे. त्यांच्यानंतर बराक ओबामा हे सर्वात जास्त इन्स्टा फॉलोअर्स असणारे नेते आहेत. मात्र दोघांमध्ये तब्बल ५० लाख फॉलोअर्सचा फरक आहे. ट्विटरवरही नरेंद्र मोदींचे पाच कोटी फॉलोअर्स आहेत. मात्र बराक ओबामा हे ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणारे नेते आहेत. 


 इन्स्टाग्रामवर मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम,  माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनाही मागे टाकले आहे. एवढच नाही तर बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन  आणि  शाहरुख खान, सलमान खानही मोदींच्या मागे आहेत.