मुंबई : ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओच्या ग्राहकांसाठी मान्सून हंगामा ऑफरची घोषणा केली. जिओच्या या ऑफरची सुरुवात २१ जुलै पासून होणार आहे. यामध्ये जिओ ग्राहकांना जुना फिचर फोन देऊन नवा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांना ५०१ रुपये द्यावे लागणार आहेत. पहिला जिओ फोन १५०० रुपयांना होता. आम्ही जिओ फोनची किंमत १५०० रुपयांवरून ५०१ रुपये केल्याचं मुकेश अंबानी म्हणाले. मान्सून हंगामा ऑफरसोबतच जिओनं बैठकीमध्ये जिओ गीगाफायबर, जिओ फोन-२ आणि जिओ गीगा टीव्ही आणि अनेक नवीन गॅजेट्स लॉन्च केली. 


4G VOLTE कनेक्टिव्हिटीसोबत जिओ फोन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२१ जुलैपासून जिओच्या फोनसाठीच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे. ग्राहक मागच्या वर्षी जुलै महिन्यात लॉन्च झालेल्या जिओ फोनच्या बदली नवीन जिओ फोनसाठी रजिस्ट्रेशन करु शकतात. रिलायन्स जिओचा हा स्मार्टफोन कायओएस वर चालतो आणि 4G VOLTE कनेक्टिव्हिटीसोबत येणार आहे. 


काय आहेत फोनची फिचर्स 


- 1.2 गिगाहर्ट्स ड्युअल-कोर प्रोसेसर आणि ५१२ एमबी रॅम 


- २.४ इंचाचा डिस्प्ले आणि ४ जीबी इनबिल्ट स्टोरेज 


- १२८ जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्ड वापरून मेमरी वाढवता येणार 


- फोनमध्ये २००० एमएच बॅटरी


- वाय-फाय सपोर्ट 


- यूट्यूब, फेसबूक आणि व्हॉट्सअॅप चालणार 


- नवीन फोनमध्ये व्हॉईस कमांड फिचर उपलब्ध


टीव्हीलाही कनेक्ट करता येणार फोन


जिओ फोन २२ भारतीय भाषांच्या सपोर्टसह येतो. याममध्ये गूगल असिस्टंटचाही सपोर्ट देण्यात आलाय. हॅण्डसेट आणि टीव्हीला एका केबलनं कनेक्ट केल्यावर कन्टेंटला टीव्हीवरही पाहता येणार आहे. जिओ फोनमध्ये जिओ सिनेमा, जिओ म्यूझिक, जिओ टीव्ही आणि जिओ एक्स्प्रेस न्यूज हे अॅप आधीपासूनच इन्स्टॉल असतात.



असा आहे जिओ फोन


जिओ फोनची खासियत


- १५ ऑगस्टपासून २,९९९ रुपयांमध्ये मिळणार जिओ फोन-२


- फोनमध्ये एफएम, वाय-फाय, जीपीएस सुविधा मिळणार


- फोनमध्ये ५१२ एमबी रॅम, इंटरनल मेमरी ४ जीबी


- फोन मेमरी १२८ जीबीपर्यंत वाढवता येणार


- फोनमध्ये ड्युअल सिम सुविधा, लाऊड मोनो स्पीकर असणार 


- २ मेगापिक्सलचा रियर आणि ०.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा