नवी दिल्ली : इंटरनेटच्या वाढत्या क्रेझमुळे गेल्या काही वर्षात भारतीयांच्या सवयी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून या सवयी कशाप्रकारे बदलल्या याचा खुलासा झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व्हेत दावा करण्यात आलाय की, भारतीयांनी खाणे-पिणे, टॉयलेटला जाणे आणि अंघोळ करणे सुद्धा कमी केले आहे. 


इंटरनेटसाठी काय काय सोडलं जाऊ शकतं?


ओपेरा वुडस्टे ट्रॅव्हल रिपोर्टने ट्रॅव्हल करणा-या भारतीयांवर एक सर्व्हे केलाय. सर्व्हेत लोकांना त्यांच्या इंटरनेट वापराबद्दल प्रश्न विचारण्यात आले आहेत. यातून समोर आले की, लोकांनी टॉयलेट, खाणे, दारू पिणे यापेक्षा जास्त इंटरनेटचा वापर केलाय. 


इंटरनेटसाठी कुणी काय सोडलं?


इंटरनेटसाठी ३४ टक्के लोक दारू पिणे सोडू शकतात.


२९ टक्के भारतीय ६ तासांपर्यंत टॉयलेटला न जाता राहू शकतात.


१६ टक्के भारतीय इंटरनेटसाठी अंघोळही करत नाहीत.


१४ टक्के लोक पूर्ण दिवस काहीच न खाताही राहू शकतात. 


नेटवर्क नसण्याची भीती 


भारतीयांमध्ये ट्रॅव्हलिंग करताना मोबाईल नेटवर्क नसण्याची भीती असते. सर्व्हेत ३४ टक्के लोकांनी मान्य केलंय की, ट्रॅव्हलिंग दरम्यान नेटवर्क नसणं चिंतेची बाब आहे. तेच २४ टक्के लोकं हे प्रवासावर होणा-या खर्चाबाबत विचार करतात. 


गर्लफ्रेन्डपेक्षा इंटरनेट जास्त महत्वाचं


इंटरनेटसाठी लोक बॉयफ्रेन्ड आणि गर्लफ्रेन्डला सुद्धा सोडणे पसंत करतात. २० टक्के लोक ट्रॅव्हलिंग दरम्यान फोन आणि इंटरनेटला जास्त गरजेचं मानतात. तेच ११ टक्के लोक गर्लफ्रेन्डसोबत वेळ घालवणे पसंत करतात आणि १७ टक्के लोक बॉयफ्रेन्डसोबत प्रवास करणे पसंत करतात. 


सोशल मीडियासाठी इंटरनेटचा वापर


३२ टक्के लोक इंटरनेटचा वापर सोशल मीडियावर अपडेट राहण्यासाठी करतात.
२८ टक्के लोक माहिती गोळा करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. 
१७ टक्के लोक जीपीएस वापरण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात.