मुंबई : भारतीय उद्योग जगताला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासोबतच ते स्थान सातत्यानं कायम ठेवणाऱ्यांच्या यादीमध्ये रतन टाटा (Ratan Tata) यांचं नाव अग्रस्थानी येतं. व्यवसायासोबत माणुसकी आणि चौकटीबाहेर जाणारी नेतृत्त्वक्षमता सर्वांपुढे आणत टाटा यांनी एक ना अनेक आदर्श प्रस्थापित केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजमितीस वयाची 84 वर्षे ओलांडली असली तरीही टाटा यांची कार्यक्षमता आणि त्यांचं कामावर असणारं प्रेम कमी झालेलं नाही. आपल्या विविध ब्रँडसाठी काम करणारा प्रत्येक कर्मचारी ज्याप्रमाणे त्यांच्यासाठी अतिशय जवळचा, त्याचप्रमाणं ज्यांच्यासाठी आपण काम करतो ते ग्राहक अर्थात सर्वसामान्य नागरिकही तितकेच महत्त्वाचे. 


म्हणूनच की काय, त्यांनी संपूर्ण देशभरात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या कारच्या मॉडेलची प्रेरणाही सर्वसामान्य कुटुंबांपासूनच घेतली. 


सोशल मीडियाच्या माध्यमातून खुद्द टाटा यांनीच Tata NANO या कारची संकल्पना कशी मिळाली आणि कारचं डिझाईन कसं तयार झालं यामागची एक गोष्ट सांगितली. गोष्ट अगदी छोटी, पण तिचे परिणाम मात्र कायमस्वरुपी मनात घर करतील असेच. 


... आणि नॅनो जन्माला आली 
नॅनो कारची संकल्पना कशी सुचली याबद्दल सांगताना टाटा लिहितात, 'मी भारतातील बऱ्याच कुटुंबांना स्कूटरवरून फिरताना पाहिलं. आई- वडिलांच्या मध्ये लहान मुल अगदी सँडविच व्हावं असं बसलेलं असायचं. अनेकदा तर घसरण असणाऱ्या रस्त्यांवरूनही ते कसेबसे जात होते....


स्थापत्यशास्त्राचं शिक्षण घेण्याचा एक फायदा मला झाला की, त्यातून मी डूडल बनवायला शिकलो. मोकळ्या वेळेत मी तेच करायचो. सुरुवातीला आम्ही एक सुरक्षित दुचाकी बनवण्याचा प्रयत्न केला. दुचाकीचं डूडल करता करता ते चार चाकी झालं.... खिडक्या आणि दारं नसणारं.... अगदीच Basic. शेवटी मी ठरवलं, ही एक कार असावी... तीच होती Nano... कायमच आमच्या माणसांसाठी बनवलेली Nano'



रतन टाटा यांनी नॅनो तयार होण्यामागची ही गोष्ट सांगितली आणि मग काय, प्रत्येकानंच या दिग्गज उद्योजकाला सलाम करत लहान तोंडी मोठा घास का असेना पण त्यांचं कौतुक केलं.