मुंबई : मोटोरोला कंपनीने आपला नवा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मोटोरोला (Motorola) ने जी सीरजचा नवीन स्मार्टफोन मोटो जी ८ पॉवर लाइट (Moto G8 Power Lite) लॉन्च केलाय. या फोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच, जबरदस्त कॅमेरा आणि प्रोसेसरचा सपोर्ट मिळणार आहे. हा फोन दोन रंगात उपलब्ध असणार आहे. यात रॉयल ब्लू आणि आर्टिक ब्लू असणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Moto G8 पॉवर लाइटचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन अँड्रॉयड ९ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनला ६.५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये  रिझॉल्यूशन ७२९x१६०० पिक्सल आहे. तसेच युजर्संना या फोनमध्ये मीडियाटेक हिलियो पी ३५ आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मिळणार आहे. 


फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये युजर्संना ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.


तसेच या फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट यासारखे फीचर्स दिले आहेत. तसेच या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १० वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते. Moto G8 पॉवर लाइटची किंमत १६९ यूरो म्हणजेच जवळपास १३ हजार रुपये आहे. याआधी कंपनीने नवीन वर्षाची सुरुवातीला जी ८ पॉवरला बाजारात उतरवले होते. मोटो जी ८ पॉवर लाइटचा लूक आधीच्या मोटो जी८ सारखाच आहे.