मुंबई : मोटोरोलाचा Moto X4 भारतामध्ये लॉन्च झाला आहे. भारतामध्ये हा फोन दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Moto X4 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आणि Moto X4 4GB रॅम आणि 62GB इंटरनल स्टोरेज असे हे दोन स्मार्टफोन आहेत. फ्लिपकार्टवर आज रात्री १२ वाजल्यापासून हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. सुपर ब्लॅक आणि स्टर्लिंग ब्ल्यू या दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Moto X4 ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसोबत येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा f/2.0 अपार्चर आणि फेस डिटेक्शनसोबत आहे. तर ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा वाईड-अँगल लेंससोबत असणार आहे. या स्मार्टफोनचा रियर कॅमेरा ड्युअर LED फ्लॅश आणि बोकेह मॉड सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही असणार आहे.


Moto X4 चे फिचर्स


5.2 इंच FHD स्क्रीन, 1080×1920 रेझ्युलेशन


IP68 वॉटर रेसिस्टंट


comm Snapdragon 630 प्रोसेसअर


2.2 GHz ऑक्टा कोअर सीपीयु आणि 650 MHz Adreno 508 GPU


अ‍ॅन्ड्रॉईड 7.1,


फिंगरप्रिंट रिडर


3000mAh, नॉन रिमुव्हेबल बॅटरी 


Moto X4 3GB रॅम आणि 32GB- किंमत २०,९९९ रुपये


Moto X4 4GB रॅम आणि 62GB- किंमत २२,९९९ रुपये