Motorola लाँच करणार Waterproof स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स
Waterproof Smartphone: मोटोरोलाच्या नव्या स्मार्टफोनबाबत मोबाईलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर असेल. हा स्मार्टफोन धूळ आणि पाण्यात खराब होणार नाही. जाणून घेऊया सविस्तर...
Motorola Waterproof Smartphone: मोटोरोला लवकरच वॉटरप्रूफ स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची मोबाईलप्रेमी मोठ्या आतुरतेने वाट पाहात आहेत. मोबाईलप्रेमी स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरची आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनीने हा प्रोसेसर लवकरात लवकर बाजारात आणावा अशी सर्व ब्रँडची इच्छा आहे. Vivo ने X90 Pro+ फोन लाँच केला असून स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 उपलब्ध आहे. Xiaomi आणि iQOO लवकरच या यादीत सामील होणार आहेत. मोटोरोलाने घोषणा केली आहे की, डिसेंबरमध्ये या प्रोसेसरसह आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणेल. फोनचे नाव Moto X40 असे असणार आहे. हा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये लाँच केला जाणार आहे. मात्र कोणत्या तारखेला सादर केला जाईल याबाबत माहिती नाही. या फोनची विक्री 2023 च्या सुरुवाताली होईल.
Motorola Moto X40 वॉटरप्रूफ!
मोटोरोला मोटो एक्स40 हा वॉटरप्रूफ असणार आहे. पाणी आणि धुळीचा या स्मार्टफोनवर काही परिणाम होणार नाही. लेनोवोचा मोबाईल डिव्हीजनचे जनरल मॅनेजर चेन जिन ने वीबो पोस्टच्या माध्यमातून हा खुलासा केला आहे की, Motorola Moto X40 IP68 सर्टिफिकेशनसह येईल. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 द्वारे संचालित होणार आहे. मोटो एक्स40मध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. फोनचे चारही कोपरे कर्व्ह्ड असणार आहेत. फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असणार आहे.
बातमी वाचा- Ola S1 Pro, Ather 450X आणि Hero Vida V1 यापैकी कोणती इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्त, जाणून घ्या किमती
Motorola Moto X40 Battery & Camera
मोटोरोला मोटो एक्स40 मध्ये ट्रिपल कॅमेरा युनिट असणार आहे. यामध्ये 50 एमपी प्रायमरी, 50 एमपी अल्ट्रा वाइड लेंस आणि 12 एमपी टेलीफोटो सेन्सर असणार आहे. सेल्फीसाठी 60 एमपी कॅमेरा असेल. या फोनची बॅटरी 68W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी असू शकते. फोनमध्ये 18 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असणार आहे. हा फोन अँड्रॉइड 13 ओएसवर चालेल.