नवी दिल्ली : मोटोरोला (Motorola) चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोटो G 5G लॉंच झालाय. युजर्ससाठी हा बजेट 5G स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जातंय. आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्डवर हा फोन लॉंच केला गेला. ७ डिसेंबरला याचा पहिला सेल सुरु होईल.


किंमत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Motorola Moto G 5G ची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. यासोबतच एचडीएफसी बॅंक (HDFC Bank) कार्ड्सवर तुम्हाला १ हजार रुपयांचे इंस्टंट डिस्काऊंट देखील मिळणार आहे.



नव्या स्मार्फोनमध्ये मोटोरोला Qualcomm Snapdragon 750G SoC चा प्रोसेसर देतोय.  OnePlus Nord मध्ये देखील याप्रकारचा प्रोसेसर देण्यात आलायं.  Moto G 5G 64GB मध्ये इनबिल्ट स्टोरेज असेल. मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून १ टीबी पर्यंत ही मेमरी वाढवू शकता. 


Motorola Moto G 5G मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप असेल. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा असून Samsung GM1 सेंसरसहीत असणार आहे. यासोबतच ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेंस आणि २ मेगापिक्सलचा डेब्थ सेंसरचा तिसरा कॅमेरा आहे. 


आयफोन १२ लॉंच झाल्यानंतर 5G सेगमेंटसाठी स्पर्धा सुरु झालीय. नुकतेच OnePlus आणि Samsung देखील या सेगमेंटमधील फोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. अशावेळी मोटोरोला देखील मागे नाहीय. कंपनी लवकरच आपला नवा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध करेल. 


भारतात  Motorola Moto G 5G खूप स्वस्त आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन यूरोपमध्ये लॉंच केला गेला. मोटोरोला मोटो जी ५ जी यूरोपमध्ये २९९.९९ यूरोमध्ये (साधारण २६,३०० रुपये) लॉंच केला गेला. तर भारतात याची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. यूरोपमध्ये वॉलकेनो ग्रे, फ्रॉस्टेड सिल्वर रंगात उपलब्ध आहे.