मुंबई : कोरोनाचे संकट असले तरी बाजारात नव नवीन मोबाईल फोन लॉन्च होत आहेत. आता मोटोरोलाने आपला आणखी तगडा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Moto-G50 असे मॉडेलचे नाव आहे. या मोबाईचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 5000mAh बॅटरी आणि 48MPचा कॅमेरा देण्यात आला आहे. मात्र, सद्या हा फोन भारतात उपलब्ध नाही. चीनमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्या आला आहे. (Motorola launches Moto G50 smartphone)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्यात युरोपमध्ये मोटोरोलाने आपला बजेट 5G स्मार्टफोन Moto G50 ला लॉन्च केले होते. आता कंपनीने या स्मार्टफोनला चीनमध्ये लॉन्च केले आहे. चीनमध्ये या फोनला केवळ 8 जीबी रॅम आणि 128  जीबी इंटरनल स्टोरेजच्या व्हेरियंटला लॉन्च  केले आहे. याची किंमत 1499 युआन ( अर्थात 17 हजार 100 रुपये) आहे.  


काय आहे मोबाईलची फिचर्स


- स्मार्टफोनमध्ये 720 x 1600 Pixel resolution सोबत 6.5 इंचाचा मॅक्स व्हिजन एचडी प्लस डिस्प्ले  
- वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिझाइनच्या या फोनमध्ये 90Hz चा रिफ्रेश रेट आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशियो 
- 8 जीबी रॅम आणि 128 जीबीचे इंटरनल स्टोरेज
- फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 480 5जी चिपसेट 
- फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1टीबीपर्यंत वाढवू शकता.
- फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
- यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक 5 मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर 
- सेल्फीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा 
- फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAhची बॅटरी दिली आहे
- ही बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. 
- फोनसोबत 10 वॉटचा चार्जर देत आहे
- फोनमध्ये अँड्रॉयड 11आउट ऑफ द बॉक्स मिळतो. रियल फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा  आहे