नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी 'मोटोरोला' लवकरच त्यांचा प्रसिद्ध ब्रँड रेजरला पुन्हा एकदा बाजारात लॉन्च करणार आहे.  कंपनीकडून Motorola Razr foldable हा स्मार्टफोन लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. येत्या १३ नोव्हेंबर रोजी हा स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची शक्यता आहे. कंपनीकडून यांच्या लॉन्चिंगबाबत टीज करण्यासही सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनी Motorola Razr foldableचं लॉन्चिंग लॉस एंजिलिसमध्ये करणार आहे. 


सीएनइटीच्या रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनमध्ये ६.२ इंची डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 710 प्रोसेसर, २७३० mAhची बॅटरी असण्याची शक्यता आहे.


४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ६ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसह फोन दोन वेरिएन्टमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.


पांढऱ्या, काळ्या आणि गोल्ड रंगात हा फोन उपलब्ध होणार असल्याचं बोललं जात आहे.


मोटोरोलाचा हा स्मार्टफोन आणखी एका महागड्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या यादीत सामिल होणार आहे. स्मार्टफोनची किंमत १५०० अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास १, ०६, ६८२ इतकी असण्याची शक्यता आहे. 


मोटोरोलाआधी 'सॅमसंग' आणि 'हुआवे' कंपनीने त्यांचे फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोटोरोल रेजर फोल्डेबल स्मार्टफोन हा  Samsung Galaxy Fold आणि Huawei Mate X यांसारख्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत डिझाइनच्या बाबतीत अगदी वेगळा असल्याची माहिती मिळत आहे.