Dhoni Kia Electric Car: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी कार आणि बाइकचा चाहता असल्याचं जाहीर आहे. महेंद्रसिंह धोनीच्या ताफ्यात एकापेक्षा एक सरस गाड्या आहेत. आता यात एका इलेक्ट्रिक कारची भर पडली आहे. महेंद्र सिंह धोनी नुकताच किआची इलेक्ट्रिक कार चालवताना दिसला. मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, धोनीने किआ EV6 गाडी खरेदी केली आहे. सिल्व्हर रंगाच्या गाडीवर तात्पुरती नंबर प्लेट लावण्यात आली होती. त्यामुळे ही नवी कोरी गाडी असल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किया मोटर्सने इव्ही6 च्या 200 यूनिटची डिलिव्हरी केली आहे. या गाडीची किंमत 59.95 लाख रुपये ते 64.95 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे. या गाडीमध्ये आकर्षक फीचर्स असून लूक स्टाइलिश आहे. पुढे ड्युअल एलईडी हेडलॅम्प असून अतिशय सुंदर आहे. दरवाजाचे हँडल दारात लपलेले असून वाहनाजवळ येताच बाहेर येतात. या गाडीला 19-इंच क्रिस्टल कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. याला मागील बाजूस कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प्स आहेत. त्यामुळे गाडी आकर्षक दिसते. धोनीने आपल्या नव्या कारमधून केदार जाधव आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासोबत रांचीच्या रस्त्यांवर फेरफटका मारला. याचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. 



आतील बाजूस, 12-इंच वक्र टच स्क्रीन सिस्टम देण्यात आलं आहे. तसेच नेव्हिगेशनला सपोर्ट करते. ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट आरामदायी आहे. म्हणजेच, एक बटण दाबून तुम्ही सीट खाली-वर करू शकता. यामध्ये हेडअप डिस्प्ले देखील उपलब्ध आहे.


बातमी वाचा- Axle Counter Box: रेल्वेरुळाच्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये नेमकं काय असतं? जाणून घ्या


किया इव्ही6 मध्ये 77.4 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही गाडी एका चार्जवर 708 किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते. विशेष बाब म्हणजे ही बॅटरी 18 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.  ही गाडी एका चार्जमध्ये रांची ते नेपाळ इतकी रेंज देईल.