नवी दिल्ली : जिओच्या अभूतपूर्व यशानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज इतर अनेक सेक्टर्समध्ये गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली.


या क्षेत्रात करणार गुंतवणूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गुंतवणूक पेट्रोलियम, दूरसंचार, पर्यटन, रिटेल बिजनेज आणि खेळ या क्षेत्रात करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे पुढील ३ वर्षात सुमारे ८० हजार लोकांना रोजगार मिळेल. ते शनिवारी झालेल्या गुवाहाटी 'ग्लोबल इन्वेस्टर्स समिट 2018' च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 


ग्लोबल इन्वेस्टर्स समिट


मुकेश अंबानींनी सांगितले की रिटेल डिव्हिजनमध्ये दोन आऊटलेट आहेत तर वाढवून ४० करण्यात येतील. २७ पेट्रोल डेपो वाढवून १६५ करायचे आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज असमचे १४५ तहसील मुख्यालयात नवीन ऑफिसेस सुरू करतील. असमने अशाप्रकारच्या ग्लोबल इन्वेस्टर्स समिटचे पहिल्यांदाच आयोजन केले होते.


या मान्यवरांची हजेरी


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या समिटचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे देखील उपस्थित होते. त्याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण सर्व कृषिप्रधान देश आहोत. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देत आहे. या कार्यक्रमाला रतन टाटा देखील उपस्थित होते.