अशा पद्धतीनं डाऊनलोक आणि सेंड करा ख्रिसमसचे खास WhatsApp स्टीकर; पाहा सोपी Trick
Happy Christmas Wishes: वर्षाचा शेवट अवघ्या पाच दिवसांवर आलेला असतानाच आता सुरुवात झालीय ती म्हणजे एका आनंदपर्वाला... अर्थात ख्रिसमसला...
Happy Christmas Wishes: संपूर्ण जगभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळत असतानाच सोशल मीडियासुद्धा या माहोलात अजिबातच मागे पडलेलं नाही. आपल्या प्रियजनांना, मित्रपरिवाराला, देशात किंवा परदेशात असणाऱ्या आपल्या खास माणसांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्याच्या विचारात तुम्हीही आहात का? शुभेच्छा द्यायच्या आहेत पण काहीतरी वेगळं करायचंय? तर सज्ज व्हा... कारण इथं आपण पाहणार आहोत ख्रिसमसच्या कमाल शुभेच्छा आणि त्याचे व्हॉट्सअप स्टीकर्स कसे बनवायचे आणि ते कसे पाठवायचे याविषयीच्या खास टीप्स...
कसं डाऊनलोड करावं Christmas Sticker?
नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्हीही स्टीकर्स शोधताय? तुम्ही अँड्रॉईड फोन किंवा आयओएस कोणत्याही मोबाईलवरून हे स्टीकर्स पाठवू शकता. त्यासाठी नेमकं काय करावं? पाहा Step by Step....
- WhatsApp सुरू करा आणि कोणत्याही व्यक्ती किंवा ग्रुपच्या चॅटबॉक्समध्ये जा.
- किबोर्डमध्ये स्माईली आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तिथं तुम्हाला स्टीकर्स पॅक दिसेल.
- आता GIF बटणाखाली असणाऱ्या स्टीकर आयकॉनवर क्लिक करा.
- स्टीकर सेक्शनमध्ये वरच्या बाजूला उजवीकडे '+' चिन्हावर क्लिक करा. खाली स्क्रोल करा आणि 'Get more stickers' निवडा.
- इथं तुम्हाला Google Play Store वर लँड करण्यात येईल. तिथं ख्रिसमस स्टीकर पॅक सुरू करा आणि डाऊनलोड करा.
- स्टीकर पॅक डाऊनलोड होताच तो Open करा आणि Add to WhatsApp वर क्लिक करा.
- आता पुन्हा व्हॉट्सअपवर या आणि आता इथं तुम्ही नव्यानं अॅड केलेले कमाल स्टीकर्स सर्वांनाच शुभेच्छांच्या स्वरुपात पाठवू शकता.
आयफोनसाठी खास सूचना...
आयओएसमध्ये व्हॉट्सअॅपला थर्ड पार्टी स्टीकर डाऊनलोड करता येत नाहीत. त्यामुळं इथं आयफोन वापरणाऱ्या मंडळींना मित्रमंडळींनी पाठवलेले हेच कलात्मक स्टीकर्स फॉरवर्ड करण्याची मुभा आहे. इथं अॅपस्टोअरवरून तुम्ही स्टीकर पॅक खरेदी मात्र करू शकता.
इतकंच नव्हे, तर तुम्ही व्हॉट्सअपवर AI फोटोसुद्धा जनरेट करू शकता. इथं फक्त ख्रिसमस स्टीकर अशी कमांड देणं अपेक्षित असेल. एका क्षणात तुमच्यासाठीचे स्टीकर्स तयार असतील. मग वाट कसली पाहताय? यंदा तंत्रज्ञानाच्या मदतीनं कलेची जोड देत साजरा करताय ना खास ख्रिसमस...?