मुंबई : तुम्ही जर म्युझिकचे शौकीन असाल आणि स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशा अॅप्सची ओळख करून देणार आहोत जी, तुम्हाला मोबाईल डेटा नसताना किंवा वाय-फाय नसतानाही चालतात. याचाच अर्थ असा की ही अॅफ विना इंटरनेट म्हणजेच ऑफलाईनही चालतात.


पॅंडोरा (Pandora):


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरे तर हे तितकेसे चर्चेत असलेले अॅप नाही. पण, गाणी ऐकण्याचा शौक ऑफलाईन पूर्ण करण्यासाठी हे अॅप जरूर तुमच्या कामी येऊ शकते. पण, हे अॅप डाऊनलोड करताना मात्र इंटरनेट सुरू असणे गरजेचे असते.


गाना (Gaana):


हे अॅप भारतात जोरदार लोकप्रिय आहे. या अॅपवरील गाण्यांचे कलेक्शनही जबरदस्त आहे. तसेच, वापर करण्यासाठीही हे अॅप सोपे आहे.


8 - ट्रॅक (8tracks):


या अॅपमध्ये रेडिओ फिचर देण्यात आले आहे. दुसरे असे की, या अॅपद्वारे तुम्ही इतर व्यक्तिंनी तयार केलेली प्लेलिस्टही ऐकू शकता. या अॅपच्या द्वारे तुम्ही तुमचे म्यूजिक वर्तुळ वाढवू शकता. तसेच, दुसऱ्या आर्टिस्ट्सलाही ऐकण्याची हे अॅप संधी मिळवून देते.


वरील सर्व अॅप ऑनलाईन काम करतात.