नवी दिल्ली : दिल्ली ते टोकियो अवघ्या ३० मिनिटात पोहोचता येईल असे कोणी सांगितले तर ? कदाचित खोटे वाटेल पण या पद्धतीचे प्लानिंग एका अवलियाच्या डोक्यात सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे निर्माते आणि उद्योजक एलोन मस्कचे संस्थापक मंगळावर लोकांच्या वस्तीचे स्वप्न पाहत आहेत. त्यांनी आणखी एक स्वप्न पाहिलं आहे. या स्वप्नावर विश्वास ठेवणे कठीण वाटले तरी हे पूर्ण झाले तर जगात अशक्य असे काहीच नसते यावर विश्वास बसेल.मस्क हे भव्य रॉकेट कोड 'बीएफआर' बनविण्याची प्लानिंग करीत आहेत. यामध्ये पृथ्वीवर कोठेही एक तासात प्रवास करण्याची क्षमता आहे. जर ही संकल्पना  पूर्णत्वास आली तर न्यूयॉर्क शहरापासून शांघायपर्यंत प्रवास करत अवघ्या३० मिनिटांमध्ये पूर्ण होईल. तर दिल्लीहून टोकियो पर्यंतचा प्रवास फक्त अर्ध्या तासात होणारआहे.
कंपनीने सिस्टम तयार करण्यास सुरुवात केली आहे. आपण सुमारे पाच वर्षात अशी यंत्रणा उभी करु शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.