MWC 2019 : पाच कॅमेऱ्यासहीत Nokia 9 PureView लॉन्च, जाणून घ्या किंमत
MWC 2019 या कार्यक्रमात Nokia नं पाच स्मार्टफोन लॉन्च केले आहेत
मुंबई : मोबाईल वर्ल्ड काँग्रेसला (MWC 2019) सुरूवात झालीय. जगभरातील स्मार्टफोन मेकर कंपन्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात... अनेक कंपन्या आपले नव-नवीन अविष्कार या कार्यक्रमात लॉन्च करतात. यावर्षी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये 5 जी स्मार्टफोन, फोल्डेबल स्मार्टफोनसहीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. या कार्यक्रमात नोकियानं (Nokia) आपला मोस्ट अवेटेड Nokia 9 PureView (नोकिया ९ प्युअरव्ह्यू) हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे, यात एक-दोन नाही तर तब्बल पाच कॅमेरे आहेत. हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात पाच रिअर कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आलाय.
Nokia 9 PureView चे फिचर्स
पाच कॅमेरे ZEISS कडून सर्टिफाईड करण्यात आले आहेत. पाचही कॅमेरे १२ मेगापिक्सलचे आहेत. यातील तीन मोनोक्रोमॅटिक लेन्ससहीत तर दोन RGB लेन्ससहीत देण्यात आलेत. सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा एक कॅमेरा आहे.
Nokia 9 PureView स्पेसिफिकेशन
- या स्मार्टफोनचा डिस्प्ले ५.९९ इंचाचा pOLED QHD आहे
- या स्मार्टफोनमध्ये Qualcomm's Snapdragon 845 प्रोसेसरचा वापर करण्यात आलाय
- रॅम ६ जीबी उपलब्ध आहे
- इंटरनल मेमरी १२८ जीबी आहे
- याशिवाय फिंगर प्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीचाही यात वापर करण्यात आलाय
- या स्मार्टफोनमध्ये Qi वायरलेस चार्जिंग सिस्टम सुविधेचा वापर करण्यात आलाय
काय आहे किंमत?
हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जवळपास ५०,००० रुपये मोजावे लागणार आहेत.
नोकियाचे पाच स्मार्टफोन लॉन्च
MWC 2019 या कार्यक्रमात Nokia नं पाच स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Nokia 9 PureView शिवाय Nokia 210, Nokia 1 Plus, Nokia 3.2, Nokia 4.2 हे स्मार्टफोनदेखील लॉन्च करण्यात आलेत. पाचही स्मार्टफोन वेगवेगळ्या सेगमेंटमधील आहेत. Nokia 210 ची किंमत २५०० रुपयांच्या जवळपास आहे. Nokia 1 Plus ची किंमत जवळपास ७००० रुपये आहे. Nokia 3.2 ची किंमत जवळपास १०,००० रुपये आहे.